पारनेर : पारनेर शहर विकास आराखडा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुजित झावरे यांनी दिली.
पारनेर येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पारनेर शहर विकास आराखडा त्वरित मंजूर करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार झावरे पाटील यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत मंजुरीचे पत्र घेतले. पारनेरचा प्रलंबित विकास आराखडा मंजूर झाल्याची माहिती झावरे यांनी दिली आहे.
पारनेरकरांच्या इतिहासातल्या सुवर्णक्षण पारनेरचा शहर विकास आराखडा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. अनेक वर्षापासून हा डी पी आर रखडला होता, म्हणून शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोजून अर्धा तासात नगर विकास सचिवांना बोलून घेऊन स्वतः स्वाक्षरी करून तो आराखड्याची प्रत देण्यात आली असल्याची माहिती झावरे यांनी दिली. त्यामुळे शहरातील पाणी, वीज प्रश्न, संविधान भवन व पारनेर शहराला प्रगतीकडे नेण्याचा सगळे मार्ग मोकळे झाले असून, शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक , पारनेर शहरात एक सुसज्ज उद्यान, भव्य क्रीडांगण, व्यापारी संकुल, पारनेर बाजारपेठ, पारनेर शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांचे सुशोभीकरण आदी कामांना चालना मिळणार आहे.
शहर विकास आराखडा जो शहरांच्या नियोजनासाठी तयार केला जातो. हा आराखडा शहराच्या भविष्यातील वाढीचा, विकासाचा आणि भौगोलिक स्वरूपाचा मार्गदर्शन करणारा दस्तऐवज असतो.नगरपंचायत ने प्रस्तावित एक आराखडा तयार करतात. यामध्ये रस्ते, उद्याने, औद्योगिक झोन, शिक्षण संस्था, निवासी भाग, इ. बाबींचा समावेश असतो.
माझ्या आयुष्यात पाहिलेला पहिला नेता असा आहे की त्यांनी अर्ध्या तासात पारनेरचा अनेक वर्ष रखडलेला डीपीआरचा प्रश्न मार्गी लावला. अशा नेत्याच्या पक्षात मी प्रवेश केला, याचा मला अभिमान आहे. पारनेर तालुक्याचा रखडलेला पाणीप्रश्नही लवकरच मार्गी लागणार आहे.सुजित झावरे पाटील