नेवाशात पाण्यासाठी नागरिकांचे आंदोलन Pudhari
अहिल्यानगर

Water Supply Crisis: नेवाशात पाण्यासाठी नागरिकांचे आंदोलन

शहरात खळबळ; नेवासकर संघटनेचा पुढाकार; अधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर स्थगित

पुढारी वृत्तसेवा

नेवासा : वर्षाची पाणीपट्टी व 6 महिन्यांचा पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील नागरिकांनी व नेवासकर संघटनेचे पदाधिकारी शांताराम गायके व विकास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत कार्यालयासमोर शहरातील नागरिकांना निदान दिवसाआड पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी शहरातून वाजतगाजत, घोषणाबाजी करत अंघोळ आंदोलन असे अभिनव आंदोलन करण्याचा प्रयत्न शुक्रवारी (दि. 19) केला. परंतु हा मोर्चा शहरातून फिरून नगरपंचायत कार्यालयासमोर येताच नगरपंचायत व वीज कंपनीचे अधिकारी आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले. (Latest Ahilyanagar News)

मुख्याधिकारी संतोष लांडगे व वीज मंडळाचे बडवे यांनी निवेदन स्वीकारले. नगरपंचायत व वीज मंडळाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. या आंदोलनामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली होती.

या ठिकाणी समर्पण फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉ. करणसिंह घुले, यमुनाबाई रेलकर, संदीप बेहेळे, संदीप आलवणे आदींनी खडेबोल सुनावत नगरपंचायत व वीज वितरण कंपनीची चांगलीच पोलखोल केली. संबंधितांनी वेगवेगळे कारणे सांगून एकमेकांना टारगेट करण्याचा प्रयत्न केला. शेवटी दोन्ही विभागाच्या अधिकार्‍यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर अंघोळ आंदोलन स्थगित करण्यात आले. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 8 दिवसांचा कालावधी संबंधितांना देण्यात आल्याचे शांताराम गायके यांनी सांगितले; अन्यथा पुन्हा नेवासकरांना सोबत घेऊन मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

या वेळी अनिल सोनवणे, शिवा राजगिरे, शिवाजी गायकवाड, मनेष चव्हाण, प्रकाश चव्हाण, हारुण जहागिरदार, नविद शेख, संपत लष्करे, अनंता डहाळे, रौफ सैय्यद, राजू कनगरे, आशफाक पठाण, संपत आळपे, शोभा आलावणे या वेळी उपस्थित होते.

नेवासेकरांसाठी सुधारित पाणी योजना सुरू करण्यात यावी व शहरातील नागरिकांना वेळेवर मुबलक पाणीपुरवठा करण्यात यावा. पाणी योजनेवरील एक्स्प्रेस लाईटवरील होणारा तुटवडा थांबवावा. नगरपंचायतीने जिल्हाधिकार्‍यांची व नेवासा नागरिकांची बैठक बोलवावी, तरच याविषयी मार्ग निघेल.
डॉ. करणसिंह घुले, समर्पण फाउंडेशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT