

संगमनेर: तालुक्याच्या पठार भागातील भोजदरी जिल्हा परिषदेची शाळेत चार शिक्षक संख्या होती. मात्र गेल्या दिड वर्षापासून एकाच शिक्षकावर सात वर्गांची जबाबदारी आहे. या बाबत प्रशासनाकडे वारंवार स्तरावर तक्रारी करुनही शिक्षक उपलब्ध होत नसल्याने अखेर पालकांनी विद्यार्थ्यांचे दाखले काढून शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.(Latest Ahilyanagar News)
पठार भागातील भोजदरी येथे पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. बदली प्रक्रियेत मंजूर चार शिक्षक असलेल्या शाळेत पूर्ण पदे भरलेली नाहीत. शासकीय व शैक्षणीक कामामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, आमदार किरण लहामटे, आमदार अमोल खताळ यांना माहिती देऊन निवेदने दिली होती.
मात्र याची कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे मुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे. पोषण आहारासाठी मुले शाळेत जातात.
दरम्यान, दोन दिवसांत दखल घेतली नाही तर सोमवारी (दि. 22) मुलांना शाळेत न पाठवता मुलांचे दाखले काढून शाळेला टाळे ठोकणार असल्याचा इशारा तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल लोहोकरे, विकास हाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी पोपट वाळुंज, विकास हांडे, बाबाजी हांडे, दिनेश सावंत, जिजाभाऊ भुतांबरे, विजय चव्हाण, रामदास चव्हाण, सिमा शिंदे, अलका वाळुंज, निकीता कोकाटे, सुमन उगले, प्रतिमा वाळुंज, शोभा वाळुंज यांनी दिला. पालक पोपट वाळुंज यांनी दिला आहे.
दोन शिक्षक सात वर्गांना शिकवत असल्याने आम्ही शाळा बंदचा निर्णय घेत आहोत. दोन दिवसांत अजून दोन शिक्षकांची नियुक्ती करा अन्यथा आम्ही सोमवारी मुलांचे दाखले काढून शाळेला टाळे ठोकणार आहोत. मुलांचे जे शैक्षणीक नुकसान होणार आहे याची सर्वस्वी जबाबदारी शासन, प्रशासनाची असेल.
नीलेश पोखरकर, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन