Municipal Election Ahilyanagar: ‘बाणा’च्या भात्यातून ‘मैत्रीपर्वाचा’ उदय?

Municipal Election Ahilyanagar
‘बाणा’च्या भात्यातून ‘मैत्रीपर्वाचा’ उदय?Pudhari
Published on
Updated on

संदीप रोडे

माजी महापौर शीला अनिल शिंदे, स्थायी समितीच्या माजी सभापती सुवर्णा दत्ता जाधव, विद्या दीपक खैरे आणि राखीव जागेवर परसराम बाळू गायकवाड असे शिवसेनेचे चार नगरसेवक धनुष्य-बाणाच्या चिन्हावर विजयी झाले होते. गत पंचवार्षिकला राष्ट्रवादी-भाजप आणि शिवसेना अशा तिरंगी लढतीत शिवसेनेचे बाजी मारली तर भाजपचे उमेदवार दुसर्‍या स्थानावर राहिले होते. आगामी महापालिका निवडणुकीत मात्र राजकीय चित्र बदललेले असेल. (Latest Ahilyanagar News)

तिरंगी लढतीतील तिन्ही पक्ष आता महायुतीचे घटक पक्ष आहेत. गतवेळचा निकाल पाहता शिवसेना चारही जागांवर दावा सांगेल, यात दुमत असण्याचे कारण नाही. मात्र शिवसेनेच्या माध्यमातून भाजप आणि राष्ट्रवादी या वार्डात चंचूप्रवेश करण्याची तयारी करणार हेही तितकेच खरे. अनिल शिंदे यांच्या विरोधात गतवेळी निवडणूक लढलेले दत्ता गाडळकर हे भाजपचे संभाव्य उमेदवार मानले जातात. शिंदे यांच्या विरोधात गाडळकर यांना 2455 तर राष्ट्रवादीचे दत्ता खैरे यांना 2089 मते मिळाली होती. शिंदे यांचा सव्वाचारशे मतांनी विजयी झाला होता, तर विरोधातील दोघांच्या मतांची बेरीज साडेचार हजारावर जाते.

Municipal Election Ahilyanagar
Bribe Case: साहेबांना पैसे दिल्याशिवाय सही करत नाहीत! जातपडताळणीसाठी महिलेने घेतली 18 हजारांची लाच

सुवर्णा जाधव यांच्या विरोधात भाजपच्या माजी उपमहापौर गीतांजली सुनील काळे व राष्ट्रवादीच्या दीपाली आगरकर यांनी निवडणूक लढविली होती. या तिरंगी लढतीत जाधव यांनी 4096 मते मिळवत 1259 मताधिक्याने विजय झाला, मात्र त्यांच्या विरोधातील काळे, आगरकर यांच्या मतांची बेेरीजही साडेचार हजारावर जाते. विद्या दीपक खैरे यांना 3120 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधातील भाजपच्या सुरेखा खैरे 2164 व आशा पवार यांना 1750 मते मिळाली होती. विरोधातील दोघींच्या मतांची बेरीज ही विद्या खैरे यांच्या मतांपेक्षा जास्त म्हणजेच 3914 होते. खैरे यांचा साडेनऊशे मतांनी विजय झाला असला तरी त्यांच्या विरोधातील मतांची आकडेवारी आश्चर्यकारक अशी आहे.

राखीव़ जागेवर परसराम गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे विजय गव्हाळे यांचा 1435 मतांनी पराभव केला होता. या एकमेव जागेवर राष्ट्रवादी दुसर्‍या स्थानी राहिली. भाजपचे चंद्रकांत पाटोळे आणि विजय गव्हाळे यांच्या मतांची बेरीज गायकवाड यांच्यापेक्षा जास्त होते. गत पंचवार्षिकचा निकाल पाहिला तर जवळपास चार हजार मते शिवसेना विरोधात होती.

Municipal Election Ahilyanagar
Sexual Assault Case| अहिल्यानगर हादरले! चार सख्ख्या बहिणींवर अत्याचार

नव्या प्रारूप रचनेत केडगावातील माधवनगर, अयोध्यानगर, रभाजीनगर, दीपनगर नव्याने जोडले गेले. गतवेळी अर्धा भाग असलेल्या आद्योगिक वसाहतीचा संपूर्ण भाग या वार्डाला जोडला गेला. कल्याण रस्त्यावरील बालाजी सोसायटी, व्यंकटेश सोसायटी, भावना सोसायटी, भृंगऋषी सोसायटी आणि प्रशांत सोसायटी असा नव्याने भाग जोडला गेला. रेल्वेस्थानक परिसरातील साडेचार हजार मतदार वगळून केडगावचे तीन हजार तर कल्याण रोडचे दीड/दोन हजार मतदान नव्याने जोडले गेले. केडगावचा भाग नव्याने जोडल्याने या उमेदवारांची धावपळ वाढणार आहे.

हीच संधी साधून राष्ट्रवादी येथून विजय गव्हाळे, संभाजी पवार, आशा पवार यांच्यापैंकी एकाला किंवा नवखा चेहरा पुढे करण्याची तयारी करत आहे. भाजपकडून दत्ता गाडळकर यांचे नाव चर्चेत असल्याने उमेदवारी देताना मोठा संघर्ष होण्याची शक्यता वर्तविली जाते.

Municipal Election Ahilyanagar
Ahilyanagar News: राष्ट्रवादीच्या ‌‘पैलवानां‌’चा वार्ड

रेल्वेस्थानक आणि सक्कर चौकातील भाग तोडून थेट केडगावपर्यंतचा भाग जोडून नव्याने 15 नंबर वार्डाची प्रारूप प्रभाग रचना करण्यात आली आहे. कल्याण रस्त्यालगतच्या पाच सोसायट्या या वार्डाला जोडल्या गेल्या. शिवसेनेचे माजी महापौर शीला शिंदे, स्थायी समितीच्या माजी सभापती सुवर्णा जाधव यांचा हा वार्ड बालेकिल्ला मानला जातो. मात्र केडगावातील सुमारे तीन हजार मतदान नव्याने जोडून नवी गणिते आखल्याची चर्चा आहे. गतवेळी शिवसेनेचे चौघेही निवडून आले होते. महायुती झाल्यास त्यातील भाजप व राष्ट्रवादी प्रत्येकी एका जागेवर दावा सांगून बाणाच्या भात्यातून ‘मैत्रीपर्वाचा’ उदय होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जाते.

शिंदे, जाधव फिक्स, अन्य दोन कोण?

अनिल शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘खास’ म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची उमेदवारी महायुतीत निश्चित मानली जाते. सुवर्णा दत्ता जाधव याही दोन वेळेस विजयी झालेल्या असून आता त्या तिसर्‍यांदा तयारी करत आहेत. शिवसेनेच्या विभागणीनंतर जाधवही शिंदे यांच्या शिवसेनेत गेल्या आहेत. हे दोन्ही माजी नगरसेवक पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित असले तरी त्यांच्या सोबतचे उमेदवार कोण अन् कोणत्या पक्षाचे याविषयी मात्र तर्कवितर्क लढविले जात आहेत. अन्य दोन जागांवर राष्ट्रवादी, भाजपकडून दावेदारी सांगितली जाईल, असे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news