नेवासा: राज्य कुस्तीगीर संघांच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघांच्या सहकार्याने व जुन्नर तालुका कुस्तीगीर संघ आयोजित 20 वर्षाखालील मुले फ्रीस्टाइल व ग्रीकोरोमन राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा नारायणगाव येथे झाल्या.
स्पर्धेमध्ये त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय त्रिमूर्ती नगर नेवासा फाटा येथील खेळाडूंनी रोमहर्षक कुस्त्या करीत अनुक्रमे कास्य व रौप्य पदक प्राप्त केले.
अतुल संतोष मोरे याने 60 किलो ग्रीकोरोमन वजन गटात कास्य पदक पटकावले तसेच शुभम मनोहर जाधव याने 77 किलो ग्रीकोरोमन गटात रौप्यपदक पटकावले. तर जयदीप गोरख पुरे हा 67 किलो ग्रीकोरोमन वजन गटात चौथ्या क्रमांकावर राहिला.
विजय खेळाडूंना संस्थेचे कुस्ती प्रशिक्षक संभाजी निकाळजे, संजय यादव यांचे प्रशिक्षण लाभले.तसेच क्रीडा प्रशिक्षक अभिजित दळवी,महादेव काकडे, छबूराव काळे, गणेश शिंदे, साहेबराव दाणे, अशोक पानकडे, संदीप वाघमारे, मुकेश जाधव, नितीन चिरमाडे, गौरव दाणे, शैलेश दाने यांचे सहकार्य लाभले.
यशस्वी खेळाडूंचे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप, संस्थेच्या अध्यक्षा अँड.सौ.सुमतीताई घाडगेपाटील, उपाध्यक्ष स्नेहल चव्हाण-घाडगे, सचिव मनिष घाडगे, सहसचिव श्रुती दीदी आमले घाडगे, विश्वस्त चेतन चव्हाण, डॉ. गौरव आमले, कुस्तीगीर संघाचे सचिव प्रा. डॉ.संतोष भुजबळ, प्राचार्य सोपानराव काळे आदींनी अभिनंदन केले.