नगर: महापालिका निवडणुकीत आमचे काम का करीत नाही, या कारणावरून सात जणांच्या टोळीने ठेकेदार तरुणाला लोखंडी कोयता आणि रॉडने बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीतील अर्ज मागे घे असे म्हणत मारहाण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाला आहेत.
याबाबत जखमी चेतन शशिकांत अग्रवाल (वय 33, रा. आनंदबाग, बुरूडगाव रस्ता) यांच्या फिर्यादीवरून विकास झिंजुर्डे, दत्ता झिंजुर्डे, प्रशांत झिंजुर्डे, महेश झिंजुर्डे, ऋषीकेश चौधरी, योगेश गुंड, विनोद जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 30 डिसेंबर रोजी चेतन अग्रवाल त्यांच्या प्रभागातील नगरसेवकाचा अर्ज भरण्यासाठी गेले. त्या वेळी संशयित आरोपींनी त्यांना धमकी दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 31 डिसेंबर रोजी दुपारी चेतन अग्रवाल हे भोसले आखाडा येथील कोहिनूर किराणा दुकानासमोर थांबले होते. त्यावेळी संशयित आरोपींनी तेथे येऊन शिवीगाळ केली. लोखंडी कोयता व रॉड मारहाण केली. संशयित आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसऱ्या गटातील शैला दिलीपराव झिंझुर्डे (वय 54, रा. बुरूडगाव रस्ता) यांच्या फिर्यादीवरून चेतन अग्रवाल, विजु फुलसौंदर (पूर्ण नाव माहिती नाही) व इतर तीन ते चार अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (दि.31) सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादींचा मुलगा विकास यास भोसले आाखाडा येथे संशयित आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ केली. मारहाण करत उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर जिवे मारून टाकू, अशी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेनंतर कोतवालीचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि परिस्थिती आटोक्यात आणली आहे.
हरकतींवरून गोंधळ... उशिरापर्यंत सुनावणी
अर्ज छाननीनंतर अनेकांनी इच्छुकांनी एकमेकांच्या विरोधात हरकती घेतल्या होत्या. अतिक्रमण, करपट्टी न भरल्याचे कारणे दिली होती. त्यात प्रभाग 14 मध्ये सुजित मोहिते व दत्ता गाडळकर यांच्या उमेदवारी हकरत घेण्यात आली होती. त्यामुळे केडगाव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर दिवसभर तणाव होता. हरकतीवर रात्री उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती. रात्री 12 वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विरोधकांच्या हरकती फेटाळून लावल्या.
मतदारयादीत नाव नाही अन् अनामत भरण्यास पैसेही..
महापालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी 788 अर्जांची छाननी झाली. त्यात सुमारे 17 अर्ज बाद ठरविण्यात आले. त्या अर्ज बाद होण्याची मजेशीर कारणे समोर आली आहे. इच्छुक उमेदवाराचे नाव मतदारयादीत नसणे, उमेदवाराने जात पडताळणीची पावती न जोडणे, सूचक व अनुमोदक एकच, सूचक अनुमोदकांच्या सह्या खोट्या, अर्ज भरला पण अनामत रक्कमच भरली नाही. अंतिम मतदारयादीत नाव नसणे, एबी फॉर्मवर खाडाखोड, शौचालयाचे प्रमाणपत्र नसणे अशा विविध कारणांनी 17 जणांचे अर्ज बाद केले.
पहिल्याच दिवशी निवडणूक मैदानाबाहेर
प्रभाग 1, 2: मधून कोणीही माघार घेतली नाही.
प्रभाग 3: आशिष रमेश ढेपे, शोभा सुधाकर बोरकर,
प्रभाग 5: आनंद हरिभाऊ दिवटे, विकी संजय इंगळे,
प्रभाग 7: प्रिया विकास माने, विलास राधाजी माने, अर्जुनराव भाऊराव बोरूडे, हनुमंत शंकर भुतकर, राहुल लक्ष्मण कोतोरे, शहाबाई बाबासाहेब नागरगोजे, अशोक आनंद बडे, पोपट मुरलीधर कोलते,
प्रभाग 10: स्नेहा श्रीपाद छिंदम, स्वाती सागर मुर्तडकर, ऋषिकेश भाऊसाहेब आंबाडे,
प्रभाग 14: मळू लक्ष्मण गाडळकर, ऋषिकेश विजय रासकर, अवधूत भगवान फुलसौंदर, हरीश शरद भांबरे,
प्रभाग 13: स्वाती मिलिंद कानडे
प्रभाग 15:नम्रता गौरव गव्हाळे, साक्षी युवराज खैरे, गणेश केरबा पोळ, शीला अनिल शिंदे,
प्रभाग 16: हर्षद अशोक कराळे, सुजित बाबूराव काकडे
प्रभाग 17: प्रतिभा ज्ञानेश्वर कोतकर, पूनम सोन्याबापू घेंबूड,