अकोले: लैंगिक अत्याचार आणि अल्पवयीन मुलींना अवेळी सामोरे जावे लागत असल्याचे पुढे येत आहे. त्यातच येथील अकोले ग्रामीण रुग्णालयात वर्षे वयाच्या मुलीने रविवारी (दि. रात्री बाळाला जन्म दिल्याचे उघडकीस आली आहे. अत्याचार करून तिच्यावर तरुणावर बालकांचे लैंगिक संरक्षण कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी:
बुद्रुक परिसरात कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या आदिवासी गरीब कुटुंबातील अकरा वर्षांच्या मुलीला वेदना होऊ लागल्याने आई-वडिलांनी तिला रविवारी रात्री आठ वाजता ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळासाहेब व डॉ. संकेत गडाख यांनी केलेल्या तपासणीत ती मुलगी गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. डॉ. मेहेत्रे यांनी तत्परतेने अकोले पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर अवघ्या दोन तासांतच मुलीची प्रसूती झाली.
डॉ. मेहेत्रे यांनी सांगितले, की मुलीच्या कोणत्याही तपासण्या आधी केलेल्या नव्हत्या. तिची प्रसूती डॉ. संकेत गडाख यांच्या पथकाने केली. तिची आणि बाळाची प्रकृती ठीक आहे. तिच्या गरोदरपणाबाबत आणि प्रसतुतीबाबतही नंतर पोलिसांना कळवलेले आहे, असेही ते म्हणाले. अकोले पोलिसांत गुन्हा दाखल दरम्यान, या मुलीवर अत्याचाराच्या आरोपावरून तिचा कथित प्रियकराच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले, की अंदाजे दहा अकरा महिन्यांपूर्वी या मुलीला कन्नड येथील नातेवाईकांचा लग्नातून पळवून नेले होते. त्या काळात त्याने चिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र पुढे ती गर्भवती राहिल्याने याने तिला येथे सोडून दिले होते. मात्र आई-वडिलांच्या तिचे सुलभ झाले. पोलिस उपनिरीक्षक भारती तपास करत आहेत.
दरम्यान, खेळण्या-बागडण्याच्या वयात तिच्यावर मातृत्वाचे ओझे लादले जाऊन हाती पाळण्याची दोरी आल्याची प्रतिक्रिया होत आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात शेकडो अल्पवयीन कुमारी माता होतात. परंतु त्याची कुठेही नोंद होत नाही आरोग्य पोहोचत नाहीत. सामाजिक दबाव, भीती आणि मौन यामुळे अनेकदा अत्याचाराची वाच्यता होत नाही. त्यामुळे कमी वयातच शारीरिक आणि सामाजिक ताणाचा डोंगर या मुलींवर कोसळ्याची माहिती समोर येत आहे. शिवाय या वयात प्रसूती मुलींच्या जीवितासह धोकादायक मानले जाते.
कर्जतमध्ये वर्षांची मुलगी गर्भवती
तालुक्यातील एका गावातअवघ्या १३ वर्षांच्या मुलीवर तिच्या मेहवण्यानेच (दाजी) अत्याचार केल्याची फिर्याद कर्जत पोलिसांत सोमवारी (दि.२३) दाखल झाली आहे. दरम्यान, या संबंधित मुलगी गरोदर राहिल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत समजलेली माहिती अशी: संबंधित आरोपीची पत्नी वादामुळे त्याच्यासोबत राहत नव्हती. मात्र तरीही आरोपी पत्नीला नांदायला नेण्यासाठी 25 ऑगस्ट 2025 रोजी आला होता. तेथे स्वयंपाकासाठी तेल आणण्याच्या बहाण्याने आरोपी १३ वर्षांच्या मेहुणीला मोटारसायकलवरून घेऊन गेला. निर्जन ठिकाणी नेऊन अत्याचार केला. या घटनेची वाच्यता केल्यास तुला व बहिणीला जिवे मारेल अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, या आत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. या प्रकरणी २७ जानेवारीला दुपारी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, आरोपीचा शोध व पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.