नेवासा : तालुक्यातील कुकाणा परिसरातील देवगाव, फत्तेपूर, शहापूर, तेलकुडगाव, देवसडे, भेंडा, चिलेखनवाडी शिवाराला शनिवारी रात्री जोरदार पावसानें झोडपले. सायंकाळी सहा वाजता देवगाव-कुकाणा दरम्यान तीन ओढ्याना, जेऊर हैबतीजवळ ओढ्याला पूर आला होता. कुकाणा-घोडेगाव मार्ग सायंकाळी पुरामुळे बंद झाला. (Latest Ahilyanagar News)
परिसरात लहान मोठ्या ओढ्यांना, नद्याना पूर आला असून, माका-कुकाणा मार्गही सायंकाळी बंद झाला. सततच्या पावसाच्या थैमानाने शेतकरी वैतागले असून, उभी शेतपिके डोळ्यादेखत जलमय होऊन नासाडी होतं आहेत. शनिवारी पाच वाजता देवगाव, शहापूर, कौठा, भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली.
कुकाणा-घोडेगाव मार्गांवर देवगाव-कुकाणा दरम्यान खाणी जवळ, कैलास पाडळे वस्तीजवळ ओढ्याना पूर आला. ऊस, कापूस, तूर शेतातून पाणी वाहिले. उसाच्या शेतातून पाणी वाहून पूर वाढला. जेऊर हैंबतीला गावाजवळच्या ओढ्याला रोज सायंकाळी पूर येत असल्यामुळे माका-कुकाणा मार्गांवर वाहतूक ठप्प होतं आहे. देवगाव भेंडा मार्गांवरही ओढे नाले पूर परिस्थिती आहे.
तिपावसाने नासाडी सुरू
देवगावला पुरामुळे दुतर्फा वाहने अडकली. उभ्या पिकांची पावसाने नासाडी सुरू आहे. रोजच्या पावसापुढे शेतकरी हतबल झाले आहेत. देवसडे येथील नदीलाही पूर आला असून, तेलकुडगाव-चिलेखनवाडी मार्ग बंद झाला आहे.
नेवासा : देवगावजवळ पूर आल्यानें कुकाणा-घोडेगाव मार्ग बंद झाला.त्यामुळे दोन्ही बाजूंना वाहने अडकली.