Kondhwa Murder Conspiracy Accused Arrest Pudhari
अहिल्यानगर

Kondhwa Murder Conspiracy Accused Arrest: कोंढवा खुनाच्या कटातील आरोपी अहिल्यानगरमध्ये जेरबंद

एमआयडीसी परिसरातून एलसीबीची कारवाई; ओंकार पवारला पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले

पुढारी वृत्तसेवा

नगर: पुणे येथील कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने एमआयडीसी परिसरातील पेट्रोलपंपा शेजारून जेरबंद केले. ओंकार दयानंद पवार (वय 24, रा.गुलटेकडी, पुणे) असे त्याचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पुण्यातील खंडणी विरोधी पथकाने नगरचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना कोंढवा पोलिस ठाण्यात खुनाचा कट रचण्याच्या गुन्ह्यात असलेला आरोपी ओंकार पवार अहिल्यानगर परिसरात आल्याची माहिती दिली.

त्यानुसार कबाडी यांनी सहायक पोलिस निरीक्षक हरिष भोये, पोलिस अंमलदार दीपक घाटकर, विष्णू भागवत, फुरकान शेख, शामसुंदर जाधव, योगेश कर्डिले, प्रशांत जाधव, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचे पथक तयार करून आरोपीच्या शोधाकामी रवाना केले.

संशयित आरोपी एमआयडीसी परिसरातील शिवाजीनगर येथील अमरदीप पेट्रोल पंपाशेजारी फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला पुण्याच्या खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT