नगर: झारखंड येथील अल्पवयीन मुलीला पळवून आणलेल्या आरोपीस नगर एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. दि. 24 मे 2025 रोजी झारखंड येथील फतेहपुर पोलिस स्टेशनला आपल्या अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने पळुन नेल्याची तिच्या वडिलांनी फिर्याद दिलेली आहे. तेथील पोलिसांनी तसा गुन्हा दाखल केलेला आहे.
या गुन्हयाबाबत झारखंड पोलिसांनी वायरलेसद्वारे एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली होती. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांना संबंधित आरोपी हा एमआयडीसी नागापूर येथे पिडीत मुलीसोबत आहे, अशी माहिती मिळाली होती. (Latest Ahilyanagar News)
त्यांनी एक पथक तयार करुन आरोपीस पकडण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याचे नाव मथान उमेश मुरुमु (वय-20 वर्ष रा. दुलाडे जि. जमदडा झारंखड) असे सांगीतले. आरोपीच्या ताब्यातून पिडीत मुलीची सुटका केली असून, आरोपी व पिडीत मुलगी पुढील कार्यवाहीकरीता झारखंड पोलिसांचे ताब्यात देण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, अमोल भारती यांचे मार्गदर्शानाखाली सपोनि माणिक चौधरी, पोसई भालेराव, दिवटे, कावरे, मिसाळ, भागवत, किशोर जाधव, अक्षय रोहोकले, दहिफळे, सोनाली जाधव यांचे पथकाने केली.