Online Medicine Sale Protest Pudhari
अहिल्यानगर

Online Medicine Sale Protest: कर्जतमध्ये ऑनलाइन औषध विक्रीविरोधात केमिस्टांचा बंद; मूक मोर्चा काढून निषेध

बोगस व धोकादायक औषधांवर बंदी घालण्याची मागणी; तहसील कार्यालयावर मूक मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

कर्जत: ऑनलाइन विक्रीमुळे बोगस विषारी घातक औषधांची सर्रास विक्री होत असून, यामध्ये अमली पदार्थाच्या विक्री होण्याच्याही घटना उघड होत आहे. यामुळे तत्काळ नागरिकांच्या आरोग्याची धोकादायक असणारी ऑनलाइन औषध विक्री सरकारने बंद करावी, अशी मागणी कर्जत तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश तोरडमल यांनी केली आहे.

ऑनलाइन औषध विक्रीच्या निषेधार्थ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे बुधवारी (दि. 20)तालुक्यात बंद पाळण्यात आला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयावर सर्व केमिस्ट बांधवांनी मूक मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

या वेळी कालिदास शिंदे, शहराध्यक्ष नागेश खेडकर, माजी सचिव गणेश काळदाते, राम ढेरे, सुदाम दळवी, राजेंद्र पठाडे, सुनील भोज, दिनेश ढवळे, रोहित शिंदे, सागर पाटील, निखिल गोलांडे यांच्यासह तालुक्यातील केमिस्ट बांधव उपस्थित होते.

या वेळी तोरडमल यांनी, अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेचे नेते जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या आवाहनानुसार पुकारण्यात आलेल्या ‌‘बंद‌’ला केमिस्ट बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे सांगितले.

शहरातील केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT