Ahilyanagar Drain Cleaning: अहिल्यानगरमध्ये 80 टक्के नालेसफाई पूर्ण; पावसाळ्यापूर्वी महापालिकेची मोहीम वेगात

सीना नदी पात्रातील गाळ काढण्याचे काम सुरू; पावसाळ्यात पाणी तुंबू नये यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना केल्या
Ahilyanagar Drain Cleaning
Ahilyanagar Drain CleaningPudhari
Published on
Updated on

नगर: महानगरपालिकेच्या यंत्रणेकडून शहरातील विविध ओढे नाल्यांच्या साफसफाईचे काम 80 टक्के पूर्ण करण्यात आले आहे. उपनगरातील सर्व ओढे-नाले आणि सीना नदी पात्रातही अनेक ठिकाणी गाळ काढून सफाई करण्यात आली आहे. पावसाळ्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे. केडगाव व सीना नदी पात्रात काही ठिकाणी साफसफाई सुरू आहे. येत्या काही दिवसांत ती पूर्ण करण्यात येईल.

Ahilyanagar Drain Cleaning
Godavari Sand Mining Protest: गोदावरीतील वाळू उपशाविरोधात महिलांचा एल्गार

महानगरपालिकेने एप्रिल महिन्यापासून नालेसफाईचे काम हाती घेतले होते. प्रमुख ओढे व नाल्यांची साफसफाई 9 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे काम महापालिकेच्या यंत्रणेने हाती घेतली आहे. शहर, सावेडी उपनगर, बोल्हेगाव, नागापूर परिसरात सुमारे 20 ते 21 ओढे नाले आहेत. त्या झाडे झुडपे असून, परिसरात नागरी वसाहत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबून नागरिकांच्या घरात शिरते.

Ahilyanagar Drain Cleaning
Nagar Manmad Highway Diesel Theft Gang: नगर-मनमाड महामार्गावर डिझेल चोरी टोळीचा पर्दाफाश; चार जणांना अटक

त्या पार्श्वभूमीवर दरवर्षी महापालिकेकडून नाले सफाईचे काम हाती घेतले जाते. महापालिकेने आतापर्यंत 80 टक्के ओढ्या नाल्यांची साफसफाई केली आहे. सनी पॅलेस- सूर्यानगर ते निर्मलनगर - गावडेमळा - गजराज फॅक्टरी - डी मार्ट समोरील पुल ते मनमाड रोड ते कराळे हेल्थक्लब, मंगल हौसिंग सोसायटी - कुष्ठधाम - रासनेनगर - मनमाडरोड - वाकळेमळा - पंपिंग स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालयामागे मार्कडेय सोसायटी- अष्टविनायक अपार्टमेंटसमोर - मिस्कीनमळा ते तारकपुर रोड - गणेशचौक ते महावीर जैन स्थानक - महावीरनगर ते चिंतामणी हॉस्पिटल, तारकपूर ते पत्रकार वसाहत - सारडा कॉलेज शेजारुन ते महावीरनगर, सुडकेमळा ते गंधेमळा कोपरा, देशमुखवाडी सर्जेपुरा - झेडपी वसाहत - पोलीस वसाहत, भिंगार नाला सोलापूर रोड - सारसनगर पूल - भोसले लॉन-वाकोडी रोडपर्यंत खोकरनाला गायके मळा ते आगरकरमळा ते काटवन खंडोबा नवीन पूल, कलानगर ते बारा ईमाम ट्रस्ट जागा, बोल्हेगाव - आंबेडकर चौक ते गणेश चौक - अमित मोटर्स - सीनानदी जुना पूल, शेंडी ओढा जाधव मळा, डॉन बॉस्को शाळा - सीना नदीपर्यंत गाडगीळ पटांगण समोरील वैरागी सप्लायर्स ते हॉटेल शेडपर्यंत नाल्याची सफाई पूर्ण करण्यात आली आहे.ृजिल्हाधिकारी कार्यालयामागे मार्कडेय सोसायटी- अष्टविनायक अपार्टमेंटसमोर - मिस्कीनमळा ते तारकपुर रोड - गणेशचौक ते महावीर जैन स्थानक - महावीरनगर ते चिंतामणी हॉस्पिटल या नाल्याची सफाई अंतिम टप्प्यात आहे.

Ahilyanagar Drain Cleaning
Shabdagandha Sahitya Sammelan 2026: अहिल्यानगरमध्ये 17 वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन; साहित्यिक मेजवानीची तयारी पूर्ण

सीना नदी पात्रात नागापूर गावठाण परिसरात आणि सीना नदीतील वारूळाचा मारूती -अमरधाम - काटवखंडोबापर्यंत सीना नदी गाळ व कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. इंजिनिअर सुरेश इथापे आणि त्यांचे पथकाने नालेसफाईच्या कामाला वेग दिला आहे.

लवकरच होणार सफाई

केडगाव - जुनी स्वास्तिक कंपनी मागील येवलेमळा ते नगर-पुणे रोड, केडगाव - हॉटेल संदीप मागील ओढा, सोनेवाडी रोड ते अमरधाम पूल ते हरिजनवस्ती मागील भाग ते जुना बंधारा (कोतकरमळा) ते देवीरोड पुल ते चिपाडे मळा ते रेल्वे लाईन, मल्हार लॉन ते हजारे घर (केडगाव).

Ahilyanagar Drain Cleaning
Ahilyanagar Jewellery Theft Case: अहिल्यानगर सावेडीतील सराफ दुकानात 2 लाखांचे सोन्याचे गंठण चोरी

शहरातील काही भागात पावसाचे पाणी सखल भागात साचत आहे. पावसाळ्यात अनेकांच्या घरात पाणी शिरते. नरहरीनगर परिसरात नेहमीच नागरिकांच्या घरात पाणी शिरत होते. त्यासाठी त्या नाल्याचे पाणी पाईप टाकून अष्टविनायक अपार्टमेंटजवळील ओढ्या वळविले आहे. पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरणार नाही, यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना केल्या आहे. यंदा 7 जूनच्या अगोदर नालेसफाई पूर्ण होईल असा विश्वास आहे.

यशवंत डांगे, आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news