Sowing Pudhari
अहिल्यानगर

Jamkhed Rabi Jowar Sowing: दुष्काळातही जामखेडच्या शेतकऱ्यांची रब्बी ज्वारीची पेरणी सुरू

खरीपापाठोपाठ रब्बी हंगामही संकटात; ६० हजार हेक्टरवर पेरणीची शक्यता, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

जामखेड: जामखेड तालुका हा रब्बीचा म्हणून असून ज्वारीचे आगार अशी ओळख आहे. या तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. जमिनीत पुरेशी ओल नसतानाही काळ्या आईची ओटी भरण्यासाठी शेतकरी रब्बी ज्वारीची कोरड्यातच करताना दिसत आहे. यंदाच्या खरीप पिकांच्या पेरण्या पावसाअभावी वाया गेल्या. पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, या संकटातही शेतकऱ्यांची जिद्द कायम असून, कितीही वेळा पेरणी करण्याची वेळ आली तरी शेतकरी माघार घेत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे.

तालुक्यात अनेकवेळा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, त्यावेळी खरिपाचे पीक आले तर काही प्रमाणात रब्बीचे पीक मिळायचे किंवा रब्बीचे पीक आले, तर खरिपात काहीतरी उत्पादन मिळायचे. यंदा मात्र खरीप आणि रब्बी असे दोन्ही हंगाम धोक्यात आहेत. जूनपासून आतापर्यंत एकदाही नदी-नाले भरून वाहिले नाहीत. त्यामुळे भूजलपातळी खालावून विहिरी कोरड्या पडल्या आहेत. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे.

यंदा जामखेड तालुक्यात 60 हजार हेक्टरच्या जवळपास रब्बीची पेरणी होण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाअभावी ही पेरणीही कोरड्यात होत असल्याने पिकांच्या भवितव्याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. पेरणी करूनही शेतकऱ्यांचे डोळे अद्याप आभाळाकडे लागले असून, चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. नवरात्राच्या काळात तरी पाऊस होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

दुष्काळाची अंमलबजावणी कधी?

शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जनावरांच्या संगोपनासाठी देण्यात येणारे अनुदान तत्काळ जमा करावे, अशी मागणीही शेतकरी करत आहेत.

तालुक्यात यापूर्वी अनेकदा दुष्काळ पडला; मात्र त्यावेळी खरीपाचे पीक आले नाही तर काही प्रमाणात रब्बीचे पीक यायचे आणि रब्बीचे नुकसान झाले तर खरीपातून काहीतरी उत्पन्न मिळायचे. यंदा मात्र पहिल्यांदाच खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम संकटात आले आहेत. जूनपासून ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत नदी-नाले एकदाही भरून वाहिले नाहीत. त्यामुळे विहिरी कोरड्या पडल्या असून जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे; आता त्याची तातडीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, जनावरांच्या संगोपनासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम तत्काळ जमा करावी. तसेच दुष्काळी उपाययोजनांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळावा.”
सादिक मुजावर, शेतकरी, जवळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT