Haregaon Post Office Pudhari
अहिल्यानगर

Haregaon Post Office: हरेगाव पोस्ट ऑफिसची इमारत जीर्ण; स्थलांतरासाठी ग्रामस्थांचा आग्रह

भिंतींना भेगा, रेकॉर्ड रूममध्ये सापांचा वावर; ग्रामपंचायतीशेजारी कार्यालय हलविण्याची मागणी, डॉ. गौतम चित्ते यांचा आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

शिरसगाव: श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव पोस्ट ऑफिसची दयनीय अवस्था झालेली आहे. उभ्या असलेल्या इमारतीला भेगा पडलेल्या आहेत. मात्र नागरिकांच्या सेवेसाठी संबंधित कर्मचारी, अधिकारी पोस्टाचा कारभार करीत आहे. परंतु या इमारतीत रेकॉर्ड रूम आहे. त्या ठिकाणी अनेक साप आढळतात. या सर्व बाबींचा विचार करून तेथे काम करायला अधिकारी, कर्मचारी घाबरतात. ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्यावर हे कार्यालय तातडीने स्थलांतर होणे गरजेचे आहे.

वरिष्ठांच्या पाहणीनुसार हे कार्यालय ब्राम्हणगाव फाट्यावर मोकळ्या जागेत घ्यावे लागेल, असे सुचविले. परंतु हरेगाव कारखाना, कॉलनी, डी-क्वार्टर आदी ठिकाणाहून वयोवुद्ध, विद्यार्थी, महिला, या सर्वांना फाट्यावर जाणे गैरसोयीचे ठरणार आहे. त्यासाठी हरेगावात मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतर केल्यास सर्वांना सोयीचे ठरणार आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे डॉ. गौतम चित्ते व पोस्ट ऑफिसचे कर्मचारी यांच्यात चर्चा झाली.

व ते पोस्ट ऑफिस हरेगाव ग्रामपंचायत कार्यलयाशेजारी स्थलांतरीत झाल्यास सर्वांना सोयीचे ठरणार आहे. या संदर्भात ग्रामपंचायत हरेगाव प्रशासक यांनी तातडीने हा प्रश्न मार्गी लागावा, त्यासाठी पुढील कार्यवाही त्वरित करून नागरिकांची गैरसोय दूर करावी. या भागातील लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून प्रश्न सोडवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीला तीन महिन्यापूर्वी पत्र दिले होते. मग कार्यवाही का झाली नाही? दिरंगाई का होत आहे, असा प्रश्न डॉ. गौतम चित्ते यांनी केला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष घालावे. त्वरित निर्णय झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा डॉ. गौतम चित्ते यांनी दिला आहे.

चांगली इमारत मिळाली तर

पोस्ट ऑफिसची इमारत फार जुनी आहे. सध्या ती विस्कळीत झाली आहे. कलरिंग करता येत नाही. पोपडे निघून पडतात. भिंतीला चिरा पडल्या आहेत. इमारत जीर्ण झाल्याने तेथून साप निघतात. ग्रामपंचायत जवळ एक चांगली इमारत मिळाली तर हे कार्यालय तेथे स्थलांतरित करू, असे सब पोस्ट मास्टर जी. एम. भोईर यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT