Child Abuse Case  Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Minor Abduction Case: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पाच दिवस अत्याचार; नराधाम अटकेत

पत्नी माहेरी गेल्याची संधी साधून गुन्हा; पोस्को अंतर्गत कारवाई

पुढारी वृत्तसेवा

घारगाव: पत्नी माहेर गेल्याची संधी साधत अल्पवयीन मुलीचे अपहरण करत घरात कोंडून पाच दिवस अत्याचार करणाऱ्या नराधामाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

अतुल रामदास बर्डे (रा.मांडवे बुद्रुक, संगमनेर) असे पोलिसांनी अटक केलेल्या नराधामाचे नाव आहे. अतुल बर्डे याची पत्नी दोन मुलांना घेवून माहेरी गेली होती. वासनांध बर्डे याने आमीष दाखवत अल्पवयीन मुलीचे 25 जानेवारीच्या रात्री अपहरण केले. घरात डांबून ठेवत सलग पाच दिवस तिच्यावर अत्याचार केला. दरम्यानच्या काळात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांनी पोलिसांत दिली.

घारगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात यांनी मुलीच्या शोधासाठी पथक रवाना केले. मात्र शोधूनही ती सापडत नव्हती. ‌‘ती‌’च्या घरापासूनच काही अंतरावर असलेल्या घरात अल्पवयीन मुलीस डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना 30 जानेवारीला मिळाली. लागलीच पोलिसांनी तिकडे धाव घेत ‌‘ती‌’ची सुटका केली.

अपहरण करत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या बर्डे यास पोलिसांनी ताब्यात घेतले. पिडित मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाले. त्यानुसार पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.

अटकेतील अतुल बर्डे यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 2 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस उपनिरीक्षक सुरेश टकले अधिक तपास करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT