Ahilyanagar Yellow Alert pudhari photo
अहिल्यानगर

Ahilyanagar Yellow Alert: नगर जिल्ह्यात सोमवारपर्यंत पावसाचा ‘येलो अलर्ट'

नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाने केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

नगर: भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात २९ जूनपर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता असल्याने जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाने केले आहे.

हवामान खात्‍याच्‍या अंदाजानुसार २५ ते २९ जूनपर्यंत हलका ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस ३० ते ४० कि.मी. प्रतितास सोसाट्याचा वारा येण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली आहे. त्‍यामुळे मेघगर्जना होत असताना, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये.

टॉवर्स, ध्वजांचे खांब, विजेचे खांब, धातूचे कुंपण, रोहित्र व लोंबकळणाऱ्या केबल्सपासून दूर राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.मदतीसाठी नजीकचे पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्‍यांनी नागरिकांना केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT