जामखेड : विरोधक गेल्या वर्षभरापासून लाडकी बहीण बंद होणार असल्याचे ओरडत आहेत. त्यांना सांगतो की मी मुख्यमंत्री म्हणून पदावर आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील सभेत दिले.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, तसेच आमदार सुरेश धस व योगेश टिळेकर, प्रा मधुकर राळेभात, प्रांजल अमित चिंतामणी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की राज्यात आम्ही जे बोलतो ते आम्ही करतोच त्यामुळेच भाजपवर जनतेचा विश्वास आहे. राज्य सरकार फक्त लाडक्या बहिणीवरच अवलंबून नसून प्रत्येक लाडक्या बहिणीला आता लखपती दीदी करण्याचा संकल्प केला आहे.
या वर्षी 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना आपण लखपती दीदी योजनेचा लाभ देणार आहोत. जलसंधारण कामांना जशी शहरी भागात अट रद्द केली, त्याच प्रकारे शहरी भागात रोजगार हमीसह विविध कृषी योजना लागू करण्यासाठी सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.