टाकळीभान : हवामान पूरक शेती ही काळाची गरज असून आपण योग्य पाऊल उचलून ऊस पिकामध्ये आवश्यक तो बदल केला पाहिजे. यात लागवड तंत्रज्ञान व बेणे बदल करून अधिक उत्पन्न वाढवावे, जैविक खतांचा वापर वाढवावा व पारंपारीक ऊस शेतीमध्ये बदल करून नवीन तांत्रिक बदल करावे, असे आवाहन हवामान पूरक शेती ई डी एफचे उपाध्यक्ष अमेरीका डॉ.अँड्र्यू हटसन यांनी केले.
अहिल्यानगर ऊस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उस क्षेत्र आहे सर्वात जास्त साखर कारखाने जिल्ह्यात आहेत. परंतु अलीकडील काळात ऊस पिकाचे चे प्रमाण कमी होत आहे, कारण पिक उत्पन्न कमी झाले आहे पिकावर आधारित शेतकरी चिंतेत आहे. यावर मार्ग शोधण्यासाठी सिंजेटा फॉउंडेशन इंडिया व ईडीफ या संस्थेच्या माध्यमातून दोन वर्षांपासून काम चालू आहे. टाकळीभान येथे सिजेंटा फॉउंडेशन इंडिया व इ. डी एफ. या संस्थेच्या माध्यमातून ऊस पिक क्षेत्र भेट व परिसंवाद मेळाव्याचे आयोजन केले होते.
यावेळी एसएफआयचे कार्यकारी संचालक राजेंद्र जोग, डॉ.ऍलिसन ईगल, उदय वड्डी, अमरीश चौधरी, समीर मिर्झा, डॉ. गजानन राजूरकर, दत्तात्रय नाईक, ज्ञानदेव साळुंके, ॲड.राजेंद्र कापसे, विष्णूपंत खंडागळे, रामकृष्ण गायकवाड आदी उपस्थित होते. वरीष्ठ शास्रज्ञ डॉ. एलिसन ईगल यांंनी ऊस पिकाचे भारताच्या जिडीपीमधील योगदान व भारत हा ऊस पिकामधून इंधन निर्मिती करणारा अग्रेसर देश बनत असल्याचे सांगितले.
राजेंद्र जोग यांनी बदलाची गरज असल्याचे सांगितले. ऊस पिकात हवामान पूरक शेतीची काळाची गरज आहे, असे गजानन राजुरकर यांनी सांगितले. जैविक नियंत्रणाच्या पद्धतीने ऊसावरील रोग व किड नियंत्रण पद्धत याचे मार्गदर्शन उदय वड्डी यांनी केले.
शेतकरी रामकृष्ण गायकवाड, पोपट गायकवाड, योगेश गायकवाड, सतीश गायकवाड, बबलू परसुवाले, कृषी उद्योजिका अर्चना आदिक, दिनकर सलालकर, सौरभ मगर, धनंजय मते, किशोर वर्पे, स्वामिनी खुरुद, पुनम खाडे,आदिनाथ सवाई, महेश नागोडे, प्रसाद साळुंके, याकूब शेख आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रकल्प प्रमुख पवन थोरात व आभार विष्णूपंत खंडागळे यांनी मानले.