राहुरी: तांदूळनेर येथे वेगवेगळ्या कारणांमधून नाईकवडे कुटूंबातील भावकीमध्ये हाणामार्याची झाल्याच्या परस्पर विरोधी फिर्यादी राहुरी पोलिसात देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोिलिसांनी दोन्ही गटाच्या 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आप्पासाहेब नाईकवडे, हे राहुरी तालुक्यातील तांदुळनेर येथे राहतात. ते पशु वैद्यकीय अधिकारी म्हणुन काम करतात. त्यांच्या घरा शेजारी महेंद्र दशरथ नाईकवडे हे राहतात. दि. 1 जुलै 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास आप्पासाहेब नाईकवडे हे त्यांच्या घरासमोर असताना तेथे काहीजण आले व येथे आमच्या गाई गोर्हे आहेत, तुझा काही सबंध नाही. (Latest Ahilyanagar News)
आम्ही कत्तलीसाठी देवू नाहीतर तसेच देवून टाकू, तुझा आमच्या येथे येणार्या माणसाला अडवण्याचा काही अधिकार नाही असे म्हणुन आप्पासाहेब नाईकवडे यांना शिवीगाळ करुन गज, लाकडी दांडा व लाथाबूक्क्यांनी मारहाण केली.
महेंद्र दशरथ नाईकवडे, दशरथ दादा नाईकवडे, संतोष काशिनाथ नाईकवडे, काशिनाथ दादा नाईकवडे, नुतन महेंद्र नाईकवडे, जनाबाई दशरथ नाईकवडे, अक्षय रावसाहेब बेलकर, विठ्ठल रावसाहेब बेलकर, सर्व रा. तांदुळनेर, ता. राहुरी, तसेच मुनिर कुरेशी व नियाज कुरेशी, दोघे रा. ममदापुर, ता. राहाता, या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
तर दुसर्या फिर्यादीत तुम्ही आमच्या जागेत काटे टाकु नका, असे म्हणाल्याचा राग आल्याने नुतन नाईकवाडे यांच्यासह त्याचे पती व सासर्यांना शिवीगाळ करत लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्यांचे शेजारी आप्पासाहेब आबासाहेब नाईकवडे हा नेहमी रस्त्याचे येणे जाण्याच्या कारणावरुन वाद घालीत असतो.
दि. 1 जुलै 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता नुतन नाईकवाडे ह्या त्यांच्या घरासमोर असताना आरोपी जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील काटे काढुन नुतन नाईकवाडे यांच्या जागेत लोटीत होते. तेव्हा नुतन नाईकवाडे यांचे पती महेंद्र व सासरे दशरथ यांनी विरोध केल्याने आबासाहेब नाईकवडे व बाबासाहेब शिवराम नाईकवाडे यांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे.