काकडी गावामध्ये गुंजाळ, सोनवणेंच्या हाती कमळ! कोल्हेंच्या उपस्थितीत स्वगृही भाजपमध्ये प्रवेश Pudhari
अहिल्यानगर

Kopargaon: काकडी गावामध्ये गुंजाळ, सोनवणेंच्या हाती कमळ! कोल्हेंच्या उपस्थितीत स्वगृही भाजपमध्ये प्रवेश

आगामी काळात काकडी गावाच्या विकासासह भाजप पक्षाची ताकद वाढविण्यासाठी एक नवे पाऊल टाकले गेले आहे.

पुढारी वृत्तसेवा

कोपरगाव: तालुक्यातील काकडी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते भीमराज गुंजाळ यांनी, मुले अर्जुन व संदीप गुंजाळ तसेच साखरबाई विश्वनाथ सोनवणे यांच्यासह पुन्हा कमळ हातात घेवून, भाजप पक्षामध्ये प्रवेश केला.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी यासर्वांनी काळे गटात प्रवेश केला होता, मात्र सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत पुन्हा स्वगृही परतून, त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. या महत्त्वपूर्ण प्रवेशामुळे आगामी काळात काकडी गावाच्या विकासासह भाजप पक्षाची ताकद वाढविण्यासाठी एक नवे पाऊल टाकले गेले आहे. (Latest Ahilyanagar News)

यावेळी, चंद्रभान गुंजाळ, साई संजीवनी बँकेचे संचालक नानासाहेब गव्हाणे, उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे, बाबासाहेब सोनवणे, राजेंद्र भालेराव आदी उपस्थित होते. गुंजाळ कुटुंबियांप्रती बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, विवेक कोल्हे यांनी नेहमी जनतेच्या विकासाचा विचार केला आहे. त्यांनी पुन्हा आमच्यावर विश्वास दाखविला आहे.

गेला काही काळ मात्र आम्ही जेथे गेलो होतो, तेथे दिशाभूल करणारा कारभार व निराशाजन्य परिस्थिती आहे. काळे गटात गेल्यानंतर आमचा काहीच दिवसात भ्रमनिरास झाला. यामुळे आम्ही पुन्हा निर्णय घेवून, भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत, पुन्हा स्वगृही परतलो आहोत, अशी भावना भाजपमध्ये आलेल्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली.

‘पुन्हा स्वगृही भाजपमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांनी काकडी गावाच्या समृद्धीसाठी योगदान द्यावे. जोमाने संघटना वाढीसाठी काम सुरू करावे. कारण काहीकाळ कुणी दिशाभूल केली असेल, तरी तुम्ही पुन्हा योग्य ठिकाणी आला आहात. यामुळे निश्चितच आगामी काळात अधिक सक्षमपणे वातावरण दिसणार आहे.
- विवेक कोल्हे, संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT