ATS Inquiry Pudhari File Photo
अहिल्यानगर

ATS Inquiry: अकोल्यातील तरुणाची 'एटीएस'कडून चौकशी ; पाकिस्तानी गँगस्टरशी सोशल मीडियावर संपर्काचा संशय

राजूर पोलिसांच्या मदतीने संबंधित तरूणाला ताब्यात घेऊन राजूर पोलिस ठाण्यात कसून चौकशी करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

अकोले: पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याच्या संशयावरून अकोले तालुक्यातील वारंघुशी येथील एका तरूणाची महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) चौकशी केली.

राजूर पोलिसांच्या मदतीने संबंधित तरूणाला ताब्यात घेऊन राजूर पोलिस ठाण्यात कसून चौकशी करण्यात आली. मात्र, प्राथमिक तपासात ठोस आक्षेपार्ह माहिती न मिळाल्याने त्याला सोडून देण्यात आले आहे.

दरम्यान, एटीएसने राज्यभर मोठ्या प्रमाणावर धाडसत्र राबवित विविध शहरांमध्ये एकाचवेळी कारवाया केल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरूणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानस्थित गुन्हेगारी नेटवर्कविरोधात ही मोहीम सुरू करण्यात आल्याचे समजते.

अकोले तालुक्यातील वारंघुशी येथील संबंधित तरूणाचे काही सोशल मीडिया व्यवहार संशयास्पद असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार एटीएसचे पथक सकाळी राजुर येथे दाखल झाले.

राजूर पोलिसांच्या सहकार्याने संबंधित तरूणाला वारंघुशी येथुन चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याच्या मोबाईल फोनसह सोशल मीडिया अकाउंट्स, डिजिटल व्यवहार आणि संपर्काची तपासणी करण्यात आली.

तपास यंत्रणांकडून विशेषतः पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्या कथित 'डोगर गँग'शी संबंधित सोशल मीडिया संपर्काची माहिती गोळा केली जात आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील काही तरूणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT