Ahilyanagar District Hospital Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar District Hospital: अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय राज्यात अव्वल

‌‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न‌’ पुरस्काराचे मानकरी

पुढारी वृत्तसेवा

नगर : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यस्तरीय ‌‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार‌’ व ‌‘महाआरोग्य सन्मान 2026‌’ पुरस्काराची घोषणा झाली असून, अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय रुग्णसेवा व इतर पात्रतेत 18 गुण मिळवत राज्यात प्रथम आले आहे.

आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांच्या वतीने 18 फेब्रुवारी 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार ही माहिती देण्यात आली. पुरस्कारासाठी निवड करताना बाह्य रुग्णसेवा, अंतर्गत रुग्णसेवा, प्रसूती, गंभीर शस्त्रक्रिया आदी निकषांचा विचार करण्यात आला आहे. तसेच आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत निर्देशांकांच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले.

सिव्हिल सर्जन रँकिंग (एप्रिल 2025 ते डिसेंबर 2025 कालावधी) राज्यातील सर्वोत्तम तीन अहिल्यानगर 18 गुण (प्रथम), हिंगोली 17 गुण (द्वितीय) व सातारा 16.2 गुण (तृतीय) आले आहे. तसेच महिला रुग्णालय रँकिंगमध्ये अमरावती जिल्ह््यातील अमरावती महिला रुग्णालय 21.2 गुण घेत प्रथम आले आहे.

राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे जिल्हा रुग्णालये व महिला रुग्णालयांमध्ये सेवा गुणवत्ता सुधारण्यास चालना मिळणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुरस्कार वितरण सोहळा लवकरच होणार असून, पुरस्कार प्राप्त जिल्ह्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय राज्यात अव्वल ठरल्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार नीलेश लंके, आमदार संग्राम जगताप आदी लोकप्रतिनिधींसह सामाजिक संघटनांनी अभिनंदन केले आहे.

शिरपेचात एक मानाचा तुरा

जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनात तत्पर रुग्णसेवा दिली जात आहे. त्यांच्या सर्व टीमने दिलेले रुग्णसेवेचे योगदान विचारत घेता राज्यात मिळालेला गौरव अहिल्यानगर जिल्ह्याचा वैद्यकीय क्षेत्रातील शिरपेचात एक मानाचा तुरा समजला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT