Ahilyanagar Jilha Parishad Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Zilha Parishad Drought Relief: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषद अभियंत्यांचे एक दिवसाचे वेतन; ९.५० कोटींचा निधी जमा होणार

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला राज्यातील ४ हजार अभियंत्यांचा हातभार; संघटनेकडून १० लाखांची स्वतंत्र मदत

पुढारी वृत्तसेवा

नगर: दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पावसाअभावी शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक अडचणीत सापडले आहेत. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटनेने यांनी घेतला आहे.

संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या सुमारे ४ हजार अभियंता सभासदांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार आहे. यामधून अंदाजे ९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जमा होण्याची अपेक्षा आहे.

याशिवाय राज्य संघटनेच्या वतीने १० लाख रुपयांची स्वतंत्र आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार आहे. दुष्काळाच्या संकटात शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यातील अभियंता बांधवांनी एकजुटीने घेतलेला हा निर्णय सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणारा आहे, असे अध्यक्ष राजू दिघे यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता व स्थापत्य अभियंता व सहाय्यक अशा सुमारे १५० अभियंत्यांचा या उपक्रमात सक्रिय सहभाग आहे.

या निर्णयाची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष सचिन चव्हाण, मुख्य सल्लागार सुहास धारासूरकर, कार्याध्यक्ष हेमा कुलकर्णी, महासचिव प्रदीप हुपरे, मंत्रालयीन उपाध्यक्ष विक्रांत शिंदे, उपाध्यक्ष मयूर मुनोत व संपादक विजय खामकर, जिल्हाध्यक्ष राजू दिघे, कार्याध्यक्ष गणेश सवाई, सचिव अभिमन्यु क्षिरसागर, कोषाध्यक्ष शिवाजी महांडुळे यांनी माहिती दिली.आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT