Sangvi Dumala Robbery: सांगवी दुमाल्यात दरोडा; मारहाणीत महिलेचा जागीच मृत्यू, पती गंभीर

९ तोळे सोन्याचे दागिने लंपास; चार ते पाच दरोडेखोरांचा सहभाग असल्याचा प्राथमिक अंदाज
Crime News
Crime NewsPudhari
Published on: 
Updated on: 

श्रीगोंदा: तालुक्यातील सांगवी दुमाला येथे दरोडेखोरांच्या मारहाणीत महिलेचा जाहगीच मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला. सोमवारी पहाटेच्या सुमारास टाकलेल्या या दरोड्यात दरोडेखोरांनी ९ तोळे सोन्याचे दागिने लुटून नेले. मंगल शिवाजी भोईटे (वय अंदाजे ६५) असे मृत महिलेचे नाव असून जखमी झालेले त्यांचे पती शिवाजी भोईटे यांच्यावर दौंड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Crime News
Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत समझोत्याची ‘एक्स्प्रेस’; राम शिंदेंच्या माघारीने राजकीय समीकरणे बदलली

याबाबत समजलेली माहिती अशी की, सांगवी दुमाला येथे शिवाजी भोईटे कुटुंबीयांचे गावात दोनमजली घर आहे. त्यात खालच्या मजल्यावर भोईटे दाम्पत्य, तर वरच्या मजल्यावर त्यांचा मुलगा बबन राहतो. मुलाचे काष्टी येथे दुकान असून ते रोज सकाळी दुकान उघडण्यासाठी लवकर घराबाहेर पडतात. आजही बबन दुकान उघडण्यासाठी सकाळी निघून गेल्याने घरातील हा प्रकार सकाळी कोणाच्याच लक्षात आला नाही.

Crime News
Shevgaon Drought: शेवगावात दुष्काळाचे सावट गडद; बैठका नकोत, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत द्या

भोईटे दाम्पत्य घराबाहेर न दिसल्याने आजूबाजूच्या लोकांनी त्यांना फोन केला; मात्र फोनला उत्तर न मिळाल्याने त्यांनी बबनशी संपर्क साधला. बबन तातडीने सांगवी येथे गेले. दरवाजा आतून बंद होता. त्यांनी लोकांच्या मदतीने दरवाजा उघडून आत पाहिले असता आई-वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. घटनेची माहिती मिळताच श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक सुभाष सानप व पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक अंदाजानुसार चार ते पाच चोरट्यांनी घरात घुसून हा दरोडा टाकला असावा.

Crime News
Jamkhed Rabi Jowar Sowing: दुष्काळातही जामखेडच्या शेतकऱ्यांची रब्बी ज्वारीची पेरणी सुरू

घरातील नऊ तोळे सोने चोरी गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. श्वानपथकाने घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत माग काढला. तेथून दरोडेखोर वाहनातून गेले असावेत. फॉरेन्सिक लॅब पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक त्या बाबींचे नमुने घेतले आहेत.

Crime News
Ahilyanagar Crime: दारूच्या व्यसनावरून मुलाला मारहाण; दोन दिवसांनी मृत्यू, आई-वडिलांकडून मृतदेह जाळला

अन्य दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दरोडेखोरांनी काष्टी पुनर्वसन येथे चोरीचा पहिला प्रयत्न केला; मात्र लोक जागे झाल्याने त्यांनी तिथून काढता पाय घेतला. नितीन पैदुलवार यांनी यातील एका चोरास पकडले होते; मात्र हाताला झटका देऊन तो पळून गेला. नितीन यांनी पाठलाग केला, मात्र चोरट्यांनी दगडफेक करत अंधारात पलायन केले. त्यानंतर एकच्या सुमारास सांगवी दुमाला येथेही चोरीचा प्रयत्न केला.

घटनास्थळाची पाहणी केली आहे. तपासाबाबत योग्य त्या सूचना केल्या आहेत. सर्व अँगल समोर ठेवून आमचा तपास सुरू आहे. लवकरच आरोपी अटकेत असतील.

सुजितकुमार क्षीरसागर, पोलिस उपअधीक्षक, कर्जत उपविभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news