Ahilyanagar Stray Dog Shelter: अहिल्यानगरमध्ये मोकाट कुत्र्यांसाठी निवारा केंद्र; ५०० कुत्र्यांच्या सांभाळासाठी वर्षाला एक कोटींचा खर्च

पिंपळगाव माळवी येथे सेंट्रल डॉग शेल्टर होम; शहरातील २५ हजार मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरण व लसीकरणाची मोहीम
Stray Dog Issue
Stray Dog Issuepudhari photo
Published on: 
Updated on: 

नगर: शहरात दिवसेंदिवस कुत्र्यांची संख्या वाढत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे महापालिकेकडून मोकाट कुत्र्यांसाठी पिंपळगाव माळवी येथे पाचशे कुत्र्यांच्या क्षमतेचे श्वान निवारा केंद्र (सेंट्रल डॉग शेल्टर होम) उभारण्यात आले असून, पाचशे कुत्र्यांचा कायमस्वरूपी सांभाळ करण्यात येणार आहे. त्यासाठी महिन्याला एक लाख ७६ हजार रुपये खर्च होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर पुन्हा बोजा पडणार आहे.

Stray Dog Issue
Sangvi Dumala Robbery: सांगवी दुमाल्यात दरोडा; मारहाणीत महिलेचा जागीच मृत्यू, पती गंभीर

दरम्यान, महापालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालय व प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पिंपळगाव माळवी येथे सेंट्रल निवारा केंद्र उभारले आहे. त्या ठिकणी पाचशे कुत्र्यांचा सांभाळ केला जाणार आहे. पकडलेल्या कुत्र्यांना ठेवण्यासाठी अद्ययावत व सुरक्षित शेड तयार केले आहे.

Stray Dog Issue
Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत समझोत्याची ‘एक्स्प्रेस’; राम शिंदेंच्या माघारीने राजकीय समीकरणे बदलली

महापालिका प्रशासनाकडून या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, क्षितिज नावाच्या संस्थेला हे काम देण्यात आले आहे. या संस्थेकडून कुत्र्यांची निगा राखण्यासाठी आणि वैद्यकीय उपचारांसाठी पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक तैनात केले आहे. कुत्र्यांना सुरक्षित वातावरणात अन्न-पाणी पुरवण्याची आणि केंद्रात स्वच्छतेची योग्य काळजी घेतली जाणार आहे.

Stray Dog Issue
Shevgaon Drought: शेवगावात दुष्काळाचे सावट गडद; बैठका नकोत, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत द्या

आता शहरात टप्प्याटप्प्याने मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम राबवून त्यांना या निवारा केंद्रात हलवले जाणार आहे. कुत्री सांभाळण्यासाठी संबंधित संस्थेला मनपा फंडातून पैसे दिले जाणार आहे. दरमहा सुमारे आठ लाख ७५ हजार तर, वार्षिक सरासरी एक कोटी रुपये खर्च होणार आहे. क्षितिज संस्थेकडून शाळा, हॉस्पिटल परिसरातील कुत्र्यांना पकडून निवारा केंद्रात ठेवण्यात येणार आहे. तर, रहिवासी भागातील कुत्र्यांसाठी नेहमीप्रमाणे निर्बिजीकरण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Stray Dog Issue
Jamkhed Rabi Jowar Sowing: दुष्काळातही जामखेडच्या शेतकऱ्यांची रब्बी ज्वारीची पेरणी सुरू

शहरात सुमारे २५ हजार मोकाट कुत्री

शहरात कुत्र्यांची संख्या २५ हजार कुत्रे असल्याचे मनपाकडून सांगण्यात येते. पकडलेल्या कुत्र्यांवर पिंपळगाव माळवी येथे निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरणाचे काम युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर या संस्थेला दिले आहे. १० ते १२ कुत्र्यांवर शस्त्रक्रिया होत असल्याने महिन्याला साधारण ३५० ते ४०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण होते.

सर्वोच्च न्यायालय व प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पिंपळगाव माळवी येथे जुन्या इमारतीमध्ये कुत्र्यांसाठी निवारा केंद्र उभारले आहे. त्यासाठी एका संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. पाचशे कुत्र्यांसाठी वर्षाकाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्राणीप्रेमी संस्थांनी कुत्र्यांसाठी निवारा केंद्र उभारल्यास मनपाकडून त्यांना निधी देण्यात येईल.

यशवंत डांगे, आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news