Assault Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Crime: धमकी देत हॉटेलमध्ये नेऊन तरुणीवर अत्याचार; गुन्हा दाखल

बदनामी व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

नगर: सावेडी उपनगरात राहणार्‍या एक वीस वर्षीय तरुणीला धमकी देवून हॉटेलमध्ये नेवून अत्याचार करण्यात आला. ही घटना 14 जून रोजी छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील हॉटेल चंद्रकांत येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

वसीम गफूर शेख (रा. पाईपलाईन हाडको, आंबेडकर चौक, सावेडी, जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 20 वर्षीय तरुणीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी तरुणीला त्यांच्या कॉलनीत राहणारा वसीम शेख याने छत्रपती संभाजीनगर हायवे रोडवरील ’हॉटेल चंद्रकांत’ येथील एका रूममध्ये नेले.

तिथे तिला बदनामी करण्याची व तिला जीवे मारण्याची धमकी देवून अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, हा प्रकार जर कोणाला सांगितला, तर तुला व तुझ्या घरच्यांना जीवे ठार मारीन, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मोंढे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT