Police Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Police Attack Mob: नगर-सोलापूर रस्त्यावर पोलिसांवर जमावाचा हल्ला; 100 हून अधिकांवर गुन्हा

दगडफेक, वाहनाची तोडफोड; अनेक पोलिस जखमी, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

नगर: स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक नगर-सोलापूर रस्त्यावर गस्त घालत असताना पथकास दुचाकी आडवी लावून जमावाने घेराव घातला. पथकावर दगडफेक करून वाहनाचे नुकसान केले. ही घटना नगर-सोलापूर रस्त्यावरील तुक्कड-ओढा येथे घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात 31 जणांसह अन्य 70 लोकांवर गुन्हा दालख करण्यात आला आहे.

योगेश पंडित बेरड, दीपक कुंडलिक बेरड, देविदास शिवाजी बेरड, राजू पंडित बेरड, मयूर अशोक पुंड, धर्मा दत्तात्रय बेरड, गणेश प्रकाश शिंदे, दीपक उर्फ खेकडा राजेंद्र बेरड, नेटके मेजर, राहुल राधाकिसन करांडे, मयूर भाऊसाहेब बेरड, भानुदास बेरड, विशाल अरुण करांडे, बाळासाहेब सूर्यभान करांडे, महादेव उर्फ महादू छबू करांडे, लहु मारुती करांडे, धनंजय अशोक करांडे, राजेंद्र बेरड, तुषार मोहन बेरड, सागर उर्फ मामु हरी बेरड, नितीन शिवाजी बेरड, भाऊसाहेब राजेंद्र बेरड, अनिल शंकर करांडे, संदीप शिवाजी करांडे, बापू करांडे, दीपक भाऊसाहेब करांडे, भाऊसाहेब करांडे, मोहन श्रीधर बेरड, सचिन अशोक बेरड, गणेश करांडे, कमलेश करांडे (सर्व रा. दरेवाडी व वाकोडी, ता. जि. अहिल्यानगर) व अन्य 70 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस कॉन्स्टेबल सुनील रमेश मालणकर यांनी फिर्याद दिली. गुरुवारी रात्री गुन्हे शाखेचे पथक परिसरात गस्त घालत असताना आरोपी योगेश पंडित बेरड याने मोटारसायकल आडवी लावून पोलिसांचे वाहन अडवले.

त्यानंतर दीपक बेरड, देविदास बेरड अन्य साथीदारांना बोलावून घेतले. दरेवाडी येथील गणेश शिंदे, दीपक उर्फ खेकडा बेरड, राहुल करांडे यांच्यासह मोठ्या जमावाने पोलिसांना घेराव घातला. जमावाने पोलिसांना अलील शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि दगडफेक सुरू केली.

या हल्ल्यात फिर्यादी सुनील मालणकर यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक हरीश भोये, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब खेडकर, मनोज साखरे व भगवान धुळे हे जखमी झाले असून शासकीय वाहनाचेही नुकसान झाले आहे. आरोपींनी पोलिसांना पुढील तपास करण्यापासून रोखून धरले, असे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश पवार करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT