Police Mock Drill Accident Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Police Mock Drill Accident: अहिल्यानगरमध्ये मॉकड्रिलदरम्यान मोठा अपघात; स्नो ग्रेनेड फुटून 4 पोलीस जखमी

ईद बंदोबस्तासाठी सुरू असलेल्या प्रशिक्षणादरम्यान दुर्घटना; दोन कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत

पुढारी वृत्तसेवा

नगर: ईदच्या पार्श्वभूमीवर आज 25 मे रोजी पोलीस मुख्यालयात सुरू असलेल्या मॉकड्रिलदरम्यान मोठी दुर्घटना घडली असून, स्नो ग्रॅनेट हातातच फुटल्याने चार पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत शिवराज पवार, शुभम कावरे, योगेश सोळुंके आणि गणेश मधे हे पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यापैकी शुभम कावरे, शिवराज पवार आणि योगेश सोळुंके हे RCP विभागातील कर्मचारी असून गणेश मधे हे QRT पथकात कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईद निमित्त बंदोबस्त आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस मुख्यालयात मॉकड्रिल सुरू होती. यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांना स्नो ग्रॅनेट हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जात असताना अचानक ग्रॅनेट हातातच फुटल्याने मोठा स्फोट झाला.

या स्फोटात शुभम कावरे आणि शिवराज पवार यांच्या हाताच्या करंगळ्या वेगळ्या झाल्याची गंभीर माहिती समोर आली आहे.

दरम्यान, कोणतेही सखोल पूर्व प्रशिक्षण न देता थेट ग्रॅनेट फोडण्यास दिल्यानेच हा प्रकार घडल्याचा आरोप जखमी कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्यांकडून केला जात आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या प्रशिक्षण पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT