Shrirampur Sand Smuggling Clash: वाळू तस्करीवरून गोदावरी पात्रात तुफान राडा; श्रीरामपूर नगरसेवकावर गोळीबाराचा आरोप

दोन गटांत हाणामारीनंतर पिस्तुलातून गोळीबार; वीरगाव पोलिस ठाण्यात 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Gun Firing
Gun FiringPudhari
Published on
Updated on

श्रीरामपूर: वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव गंगा व श्रीरामपूर येथील वाळू तस्करांच्या दोन गटांत गोदावरी पात्रात शनिवारी रात्री तुफान हाणामारी झाली. ‌‘तू आमचे लोकेशन महसूल व पोलिसांना कळवतो, या संशयातून हा राडा झाला. यावेळी ‌‘तुला नीलेश शेंडगेसारखेच संपवतो‌’ असे म्हणत श्रीरामपूरच्या नगरसेवकाने गावठी पिस्तुलातून (कट्टा) दोन गोळ्या झाडल्या. याप्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात श्रीरामपूरचे नगरसेवक अर्जुन खुशाल दाभाडे यांच्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gun Firing
Ahilyanagar Legislative Council Election: अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; महायुतीत उमेदवारीवर सस्पेन्स कायम

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बाभुळगावगंगा येथील जालिंदर सोपान कुंजीर याची गोदावरी नदीलगत विहीर आहे. रात्री कुंजीर तेथे वीजपंप चालू करण्यासाठी गेला, त्या वेळी नदीकडून काही जणांचा बोलण्याचा त्याला आवाज आला. कुंजीर तिकडे गेला. नदीत अंधारात 10 ते 15 लोकांचा जमाव त्याला दिसला. त्यात श्रीरामपूरचे नगरसेवक अर्जुन खुशाल दाभाडे, उद्देश अशोक मंडलिक, महेश गायकवाड, विकास ऊर्फ विकी बबन दमके, राहुल चव्हाण, विजय ऊर्फ भोगर भास्कर हटांगळे, मंगेश साहेबराव साळवे, विजय पवार, राहुल थोरात (सर्व रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर) हे हातात लाकडी दांडके घेऊन उभे होते. हे सर्व जण जालिंदर कुंजीर यांच्या शेताशेजारी यापूर्वी वाळू चोरी करीत असल्याने त्यांना ओळखतात, असे सांगितले जाते.

Gun Firing
Sangamner Quarry Accident: संगमनेर हादरले! दगड खाणीत बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

दरम्यान, कुंजीर आणि आरोपी समोरासमोर आल्यानंतर विकी ढमके याने ‌‘तू आमचे लोकेशन महसूल व पोलिसांना कळवतो का,‌’ असे म्हणत कुंजीरला शिवीगाळ केली. अर्जुन दाभाडे याने कुंजीरला चापटी मारल्या व त्याच्यावर पिस्तूल रोखून ‌‘तुला नीलेश शेंडगेसारखेच संपवतो‌’ असे धमकावले. कुंजीरने घरी फोन करून त्याच्या नातेवाइकांना घटनेची माहिती दिली.

Gun Firing
Nagar Storm Rain Damage: नगर जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा; कांदा-फळबागांचे मोठे नुकसान

काही वेळातच विजय कुंजीर, शरद कुंजीर, दीपक कुंजीर, शिवा कुंजीर, बद्री कुंजौर, संदीप कुंजीर, राहुल गायधने, दिलीप परदेशी, सतीश बोरगे हे सर्व जालिंदर कुंजीर यास सोडविण्यासाठी नदीत आले. दोन्ही गटांत शाब्दिक बाचाबाची झाली. नंतर दाभाडे याने पिस्तुलातून कुंजीरच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. अंधार असल्याने नेम चुकल्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. नंतर कुंजीर व त्याचे भाऊ पळून गेले. याप्रकरणी जालिंदर सोपान कुंजीर यांच्या फिर्यादीवरून वीरगाव (ता वैजापूर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gun Firing
Maharashtra Petrol Diesel News: राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवडा नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका: कृषीमंत्री भरणे

दाभाडे वॉन्टेड आरोपी

श्रीरामपूरचे नगरसेवक अर्जुन दाभाडे याच्याविरुद्ध नायगाव येथील गोदावरी पात्रात वाळू तस्करीवरून नीलेश शेंडगे याच्या हत्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून दाभाडे पसार आहेत. पोलिस दाभाडेच्या शोधात असताना आता हे प्रकरण घडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news