Ahilyanagar Municipal Worker Attacker Arrested Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Municipal Worker Attack: महापालिका कामगारावरील हल्ल्यानंतर तिघे हैदराबादला पसार; नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोघांनाही ताब्यात; पाचही आरोपी भिंगार पोलिसांच्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

नगर: महापालिकेचे कंत्राटी कामगार धीरज परदेशीवर हल्ला करून पसार झालेल्या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या. पळून जाण्यासाठी त्यांना मदत करणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटकेतील पाचही आरोपींना भिंगार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद , मेहराज इब्राहिम सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद (तिघेही रा.आलमगीर मदरसाजवळ, भिंगार) अशी हैदरबादमधून अटक केलेल्यांची तर त्यांना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या ख्वाजामियॉ उर्फ अकरम याकुब सय्यद (रा.आलमगीर,भिंगार) आणि वसीम रहिम सय्यद (रा.वाबळे कॉलनी, फकीरवाडा, मुकूंदनगर) या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) दुपारी अक्षय कैलास मुळे आणि धीरज कचरूसिंग रजपूत (परदेशी) हे मुकुंदनगरमधील दर्गादायरा येथे लाईटचे काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मेहराज अस्लम सय्यद, सिराज अस्लम सय्यद, मुस्तकीम अस्लम सय्यद, युनूस शेख व इतर 2 ते 3 अनोळखींनी जीवघेणा हल्ला केला.

हल्ला केल्यानंतर तिघेही आरोपी हे छत्रपती संभाजीनगर येथून रेल्वेने हैदराबाद येथे पोहचले. पसार आरोपीच्या शोधासाठी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पोलिस पथके तयार करत तपासाच्या सूचना दिल्या. गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुस्तकीम खाजामिया सय्यद हा साथीदारांसह हैदराबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक तिकडे पोहचले.

हैदराबाद कमीशनर टास्क फोर्स, खैराटाबाद झोन यांची मदत घेत नगर पोलिसांनी मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद यांना पकडले. लाकडी बल्ली व लोखंडी पाईपने धीरज कचरूसिंग रजपूत यांना दर्गादायरा, मुकूंदनगर येथे मारहाण केल्याची कबुली दिली. तिघांना हैदराबाद येथे पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या ख्वाजामियॉ उर्फ अकरम याकुब सय्यद आणि वसीम रहिम सय्यद यांची नावे पोलिसांना सांगितली. या दोघांना शोधून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडलेल्या पाचही आरोपींना भिंगार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिष भोये, उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, पोलिस अंमलदार संदीप पवार, विजय ठोंबरे, फुरकान शेख, गणेश धोत्रे, शाहीद शेख, राहुल डोके, रणजीत जाधव, प्रशांत राठोड, राहुल द्वारके, रमिझराजा आतार, अरूण मोरे, अभिजीत अरकल व शिर्डीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पेश चव्हाण, अंमलदार कैलास राठोड यांच्या पथकाने हैदराबादमधून तिघांना ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT