Kopargaon Theft: कोपरगावात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री घरफोडी, दुचाकी चोरी अन् दुकानांवर डल्ला

वृत्तवाहिनीच्या कार्यालयासह विविध ठिकाणी चोरीचा प्रयत्न; चार चोरटे सीसीटीव्हीत कैद, नागरिकांत भीतीचे वातावरण
Theft
TheftPudhari
Published on
Updated on

कोपरगाव: तालुक्यातील संवत्सर परिसर, ग्रामीण भाग व शहरात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. एकाच रात्री शहरात विविध ठिकाणी घरफोडी, दुचाकी चोरी व दुकानांसह वृत्तवाहिनीचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केल्याची संतप्त घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून एकाच रात्री झालेल्या या धडाकेबाज चोऱ्यांमुळे संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Theft
Akole Crime: दारूच्या वादातून एकाचा खून; मृतदेह धरणात फेकला, महिनाभराने गुन्ह्याचा पर्दाफाश

​बागुल वस्ती येथील 'शिवशंभू अपार्टमेंट'मधील ज्ञानदेव वाके यांचे कुटुंबिय कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून, चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून, कपाटातून ११ हजार रुपये लांबवले. चोरट्यांनी पार्किंगमधील दुचाकी चोरून नेली. विशेष म्हणजे, चोरट्यांनी अगोदर दुसरीकडून चोरून आणलेली दुचाकी या पार्किंगमध्ये सोडून नवीन दुचाकीवरून पोबारा केला.

Theft
Ahilyanagar Vidhanmandal Andaj Samiti: अंदाज समितीसमोर अधिकारी धारेवर; जाता जाता अहिल्यानगरच्या कामांचे कौतुक

या घरफोडीनंतर चोरट्यांनी अन्नपूर्णानगर येथील चौधरी बंगल्यातील एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाचे कडी-कोयंडे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. शितल हॉटेलजवळ श्रीसाई कुबेर सिटी व श्रीराम पार्क परिसरातील प्रथमेश किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला.

Theft
Kadus Crime: कडूसमध्ये ४२ वर्षीय महिलेची दगडाने डोक्यात वार करून निर्घृण हत्या; ग्रामस्थ आक्रमक

यासर्व घटनांमधील चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिस आता या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा तपास करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात सोनसाखळी चोरी, घरफोडी व दुकान फोडीच्या घटना वाढत आहेत..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news