नगर: अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवून गर्भवती करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने बेड्या ठोकल्या. हमीद शौकत सय्यद (रा. लोंढे मळा, अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, फिर्यादी, तिचा मुलगा व नात असे तिघे घरी राहत होते. फिर्यादीची नातीने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. 20 फ्रेबुवारी रोजी फिर्यादीची नात घरी आली तेव्हा तिला चक्कर आल्यासारखे वाटत होते. तिला विचारणा केली असता पोटा दुखत असून तिने रडत रडत गर्भवती असल्याचे सांगितले. आरोपी हमीद सय्यद याच्यापासून गर्भवती राहिल्याचेही सांगितले.
आरोपी हमीद सय्यद याने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. ही घटना कल्याण रोड परिसरातील एका घरामध्ये घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा व अत्याचारा गुन्हा गुन्हा दाखल झाला. गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना आरोपीचा शोध घेण्यास सांगितले.
त्यानुसार कबाडी यांनी उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलिस अंमलदार गणेश लबडे, फुरकान शेख, दीपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, सुनील मालणकर, योगेशे कर्डिले, महिला पोलिस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिवाजी शिंदे, सुर्वणा गोडसे, चालक उत्तरेश्वर मोराळे, अर्जुन बडे यांचे पथक तयार करून आरोपीच्या शोधाकामी रवाना केले.
पोलिस आरोपींचा शोध घेत असाताना माहिती मिळाली, वरील गुन्ह्यातील आरोपी हमीद सय्यद हा लालटाकी परिसरातील आण्णाभाऊ साठे चौकात आहे. त्यानुसार पथकाने परिसरात जावून संशयित तरुणास ताब्यात घेतले. त्याला नाव विचारले असता हमीद सय्यद असे नाव सांगितले. वरील गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी हमीद सय्यद याला पुढील तपासाकामी तोफखाना पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.