नगर: फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात प्रथम नागरिक कोण असणार याचा फैसला होणार आहे. महापौर व उपमहापौर पदांची निवडणूक फेब्रुवारी रोजी होणार असून, निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची पीठासीन अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना व जानेवारी आणि फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. प्रथम नागरिक कोण होणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. मात्र यासाठी दहा दिवस करावा लागणार आहे.
अहिल्यानगर महापालिकेची नुकतीच निवडणूक झाली. निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांची नावे महाराष्ट्र राजपत्रात नुकतीच प्रसिध्द झाली असून, प्रत्येक राजकीय पक्षांनी नगरसेवकांची गटनोंदणी केली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजप युतीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे महापौर विराजमान होण्याची शक्यता बळावली आहे. मात्र जागा राष्ट्रवादीचा की जागा भाजपचा महापौर होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अहिल्यानगर महापौर, उपमहापौर निवडीसाठी विभागीय डॉ. प्रवीण गेडाम यांनी मंगळवारी कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार फेब्रुवारी रोजी सकाळी वाजता अहिल्यानगर महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून, विभागीय यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची पीठासीन अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
हात उंचावून मतदान
महापौर, उपमहापौर निवडीच्या विशेष सभेत माघारीनंतर पदासाठी एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास तर हात उंचावून मतदान घेतले जाणार आहे. महापौर पदासाठीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपमहापौर पदासाठीही याच प्रक्रिया केली जाईल, असे तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
एकालाच सूचक, अनुमोदक होता येणार
कोरे नामनिर्देशन पत्रे महापालिकेतील नगरसचिव कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापौर, उपमहापौर निवडणूक भरलेली नामनिर्देशन पत्रे वेळेत दाखल करावे लागणार आहे. महापौर किंवा उपमहापौर पदासाठी चारपेक्षा अधिक नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाही. महापौर किंवा उपमहापौर पदासाठी कोणत्याही पालिका एका पेक्षा अधिक उमेदवारांची करता येणार नाही किंवा त्यास देता येणार नाही, असेही यशवंत डांगे यांनी सांगितले.
महापौर, उपमहापौर निवडीचा कार्यक्रम
नामनिर्देशने सादर करण्याची मुदत :
२९ व ३० जानेवारी आणि 2 फेब्रुवारी (कार्यकालीन वेळेत)
नामनिर्देशनाची छाननी:
६ फेब्रुवारी (सभागृहात पिठासीन अधिकारी)
उमेदवारी माघार:
६ फेब्रुवारी (छाननीनंतर १५ मिनिटे)
मतदान:
माघारी मुदत संपल्यानंतर एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास