Fake Disability Certificate Pudhari
अहिल्यानगर

Fake Disability Certificate Scam: बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; दोन एजंट अटकेत

50 हजार ते दीड लाखांची उकळपट्टी; आतापर्यंत 9 आरोपींवर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्हा रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी मध्यस्ती करणाऱ्या दोन एजंटाना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. कुणाला 50 हजारात तर, कुणाला दीड लाखांत दिव्यांग प्रमाणपत्र काढून दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. न्यायलायाने त्यांना 17 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दिलीप राजेंद्र आंधळे (रा. जिरेवाडी, ता. पाथर्डी), जालिंदर उर्फ प्रेमकुमार अरुण वारे (रा. बालिकामश्र रोड, अहिल्यानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

जिल्हा रूग्णालयातील काही कर्मचाऱ्याना हाताशी धरून कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता तसेच रूग्णालयात नोंद न करता थेट ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यात आल्याचा प्रकार जिल्हा रूग्णालय प्रशासनाच्या चौकशीतून उघडकीस आला होता.

याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीखक उगले गुन्ह्याचा तपास करीत आहेत. आतापर्यंत या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने 7 आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, गुन्ह्याच्या तपासात मंगळवारी पाथर्डी व नगर मधील दोन एजंटाना पकडले.

यापूर्वी अटक केलेल्या आरोपींना दिव्यांग प्रमाणपत्र काढून देण्यासाठी ऑलनाईन पैसे स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली. कोणाकडून 50 हजार तर कोणाकडून दीड लाख रुपये घेऊन दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे तपासात समोर आले आहे. अटक केलेल्या दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 17 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आतापर्यंत नऊ आरोपी अटकेत

या गुन्ह्यात यापूर्वी शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील शिक्षक, मंगळूरपीर (जि. वाशिम) येथील लिपिक, पुणे महापालिकेच्या मुंढवा शाळेत शिक्षक यांच्यासह आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपी मयत झाला असून, तीन आरोपींनी अटकपूर्व जामीन घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT