MPKV Rahuri Tractor Misuse: राहुरी कृषी विद्यापीठात ट्रॅक्टर गैरवापर; प्राध्यापक रंगेहात पकडले

शासकीय साधनांचा खासगी वापर उघड; प्रशासनाच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष
MPKV Rahuri
MPKV RahuriPudhari
Published on
Updated on

राहुरी: महात्मा फुले कृषी विद्यापीठातील यंत्रसामग्री, मनुष्यबळ आणि संसाधने थेट अधिकाऱ्यांच्या खासगी शेतात वापरली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रकरणात, एक सहायक प्राध्यापक विद्यापीठाच्या मालकीचा ट्रॅक्टर स्वतःच्या शेतात वापरत असल्याचा प्रकार उघडकीस आला. काही नागरिकांनी त्याचे चित्रीकरण करून विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाला माहिती दिली.

MPKV Rahuri
Ashok Kharat: ‘समता’ पतसंस्था प्रकरणात 38 खातेदारांचा इन्कार; ईडी चौकशीची शक्यता

सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन ट्रॅक्टरसह संबंधिताला पकडले. शासकीय मालमत्तेचा असा बिनधास्त गैरवापर होत असताना प्रशासन गप्प का, असा प्रश्न विचारला जात आहे. या संदर्भात बियाणे विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र काशिद यांनी कारवाईला दुजोरा दिला असून याबाबतचा अहवाल संशोधन संचालकांकडे सादर झाल्याचे सांगितले. मात्र, यापूर्वीच्या अनेक प्रकरणांचा अनुभव पाहता या प्रकरणातही केवळ चौकशीचा देखावा करून संबंधिताला वाचवले जाणार का, अशी चर्चा रंगली आहे.

MPKV Rahuri
Ahilyanagar Bhistbagh Mahal: भिस्तबाग महालाचा बदलणार लूक; सुशोभीकरणाला वेग

विद्यापीठातील संशोधन आणि साधनसामग्री शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरली जाणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात अधिकाऱ्यांच्या खासगी फायद्यासाठी त्यांचा वापर होत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, जळगाव येथे विद्यापीठाच्या साहित्याचा गैरवापर, बेकायदेशीर वृक्षतोड, तसेच आर्थिक अपहाराच्या आरोपांनंतरही अंतिम कारवाई प्रलंबितच असल्याचे समजते.

MPKV Rahuri
Ahilyabhavan Nagar Project: अहिल्याभवनाला मंजुरी: महिला-बाल विकासासाठी 15 कोटींचा प्रकल्प

विद्यापीठातील बांधकाम विभागाचा कारभारही संशयाच्या भोवऱ्यात आहे. कोट्यवधी रुपयांच्या कामांचे तुकडे करून ठेके देणे, नियमबाह्य नियुक्त्या आणि आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव अशा आरोपांबाबत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आढावा बैठक घेत पोलखोल केली होती. मात्र त्यानंतरही परिस्थितीत काहीच बदल झाला नसल्याचा आरोप होत आहे. उलट पुन्हा तेच प्रकार जोमात सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

MPKV Rahuri
Sangamner Power Cut Protest: संगमनेरमध्ये वीज खंडितीवर शेतकऱ्यांचा संताप; रास्ता रोको आंदोलन

यापूर्वीही विद्यापीठातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सेवा पुस्तकात खाडाखोड करून शासकीय सेवेचा लाभ घेतल्याची तक्रार करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर ट्रॅक्टर प्रकरणात शासन आणि विद्यापीठ प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news