Ahilyanagar BJP Protest Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar BJP Protest: अहिल्यानगरमध्ये भाजपचा निषेध आंदोलन; हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून संताप

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेवरील वक्तव्याच्या निषेधार्थ जुन्या बसस्थानक चौकात भाजपचे आंदोलन; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नगर: छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानाशी करणारे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बेताल वक्तव्याचा अहिल्यानगर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. सपकाळ यांची प्रतिमा रस्त्याला चिटकवून ती पायाखाली तुडवली, तसेच जोडे मारून निषेध केला. दरम्यान, सपकाळ यांची जीभ छाटणाऱ्यास शहर भाजपच्या वतीने दहा लाखांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा या वेळी करण्यात आली.

शहरातील जुन्या बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास रविवारी सकाळी शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी पुष्पहार अर्पण करून हे निषेध आंदोलन केले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा देऊन हर्षवर्धन सपकाळ मुर्दाबाद अशा घोषणा पदाधिकाऱ्यांनी दिल्या.

या वेळी सरचिटणीस निखिल वारे, युवा मोर्चा अध्यक्ष रुद्रेश अंबाडे, नगरसेवक महेश लोंढे, आकाश त्रिंबके, सतीश शिंदे, संजय गायकवाड, उदय अनभुले, ज्ञानेश्वर धिरडे बाबासाहेब सानप, मिलिंद भालसिंग, सुरेश लालबागे, राजेंद्र फुलारी, भार्गव फुलारी, अभिजित बुरुडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

अनिल मोहिते म्हणले, आमच्या दैवताचा जो अपमान हर्षवर्धन सपकाळांनी केला, त्याबद्दल आम्ही अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करत आहोत. हिंदूंची सरेआम कत्तल करणाऱ्या टिपू सुलतानाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर करणे ही अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे.

औरंगजेबाच्या समाधीचे उदात्तीकरण करणाऱ्या काँग्रेसकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नाही. त्यामुळे अशा या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने त्वरित राजीनामा द्यावा. यावेळी बाबासाहेब सानप यांनीही हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT