मुंबई : पुढारी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून पेगासस प्रकरणावर विरोधक सरकार टीका करत आहेत. पण हे पेगासस प्रकरण सरकारला बदनाम करण्याच षडयंत्र असल्याच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
फोन टॅपिंगच्या मु्द्दयावरून विरोधक संसदेत गोंधळ घालत आहेत; पण केंद्र सरकारने कुणाचेही फोन टॅप केलेले नाहीत. विरोधकांचे आरोप दिशाभूल करणारे आहेत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
तसेच फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे तर मनमोहन सिंग यांच्याच काळात झाल्याचा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
सोमवारपासून संसदेचं अधिवेशन सुरू झाले आहे. मात्र कामकाजच बंदच रहावे, असा प्रयत्न विरोधी पक्षाकडून होतोय. कपोलकल्पित बातम्या पेरून अधिनेशनाच्या कामकाजात अडथळे आणले जात आहेत.
पेगासस प्रकरणच आधारहीन आहे, असा दावाही त्यांनी केला. केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की आपली कोणतीही एजन्सी अशा प्रकारचं बेकायदा कृत्य करत नाही. असही फडणवीस यांनी म्हटल.
आपल्याकडच्या टेलिग्राफ कायद्याने मोठ्या प्रमाणावर कठोर नियम केले आहेत. एनएसओ या पेगासस तयार करणाऱ्या कंपनीने देखील अशा प्रकारच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.
त्यांनी या मीडिया हाऊसला देखील निराधार यादी प्रकाशित केल्याची नोटीस बजावली आहे. असेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पेगासस हे एक स्पायवेअर सॉफ्टवेअर आहे. इस्त्रायलच्या एनएसओ ग्रुपकडून हे स्पायवेअर बनवण्यात आले. हा स्पायवेअर काही जणांच्या फोनमध्ये सोडण्यात आल्याचे म्हणणे आहे.
फ्रान्सच्या फॉरबिडन स्टोरीज या मीडिया नॉन प्रॉफिट संस्था आणि ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या मानवाधिकार संघटनेकडे एनएसओच्या फोन नंबरचा डेटा होता.