मुंबई

तृप्ती देसाई : आपल्या महाराष्ट्रात नो ब्रा डे साजरा केला पाहिजे

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रा वरून सुरु झालेल्या वादामध्ये भूमाता ब्रिगेडच्या फायरब्रँड नेत्या तृप्ती देसाई यांनी उडी घेतली आहे.

अभिनेत्री हेमांगी बाई, बुब्स आणि ब्रा या विषयाला हात घातल्यानंतर त्यावरून आता सोशल मीडियात दोन्ही बाजूने रणकंदन सुरु झालं आहे. आता या वादामध्ये तृप्ती देसाई यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

सदर अभिनेत्री आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोडच्या विरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होत्या मला माहित नाही. अशा शब्दात त्यांनी हेमांगी कवीला फटकारले. तथापि, हेमांगीने घेतलेल्या भूमिकेचे तृप्ती देसाई यांनी स्वागत केलं आहे.

अधिक वाचा 

त्यांनी फेसबुक पोस्ट करून या मुद्यावर भाष्य केलं आहे. त्यांच्या या जाहीर लेखाचे स्वागतच आहे. सर्वांनीच आता जाहीरपणे व्यक्त होणे ही काळाची गरज आहे. असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

त्यावेळी प्रवीण तरडे यांनी जाहीर पाठिंबा दिला, ना हेमांगी

परंतु मला त्यांना आवर्जून सांगायचे आहे की ज्या महिला या संदर्भात गॉसिप्स करतात. उघडपणे बोलत नाहीत.

विकृत मानसिकतेचे पुरुष असोत त्यांची तर मानसिक बदलण्यासाठी आमचाही प्रयत्न आहे.

तो करताना ट्रोलिंग, शिवीगाळ, हल्ले याला आम्हालाही सामोरे जावे लागले. परंतु त्यावेळी मात्र ना प्रवीण तरडे यांनी जाहीर पाठिंबा दिला, ना हेमांगी यांनी.

अधिक वाचा 

जेव्हा महिलांना मासिक पाळी या विषयावरून दुजाभाव केला जातो. अनेक ठिकाणी बंदी घातली जाते. याविषयीही आम्ही कृतीत आंदोलने केली परंतु अशा वेळेला असे लोक का साथ देत नाहीत हे समजले नाही.

इंदुरीकर तर जाहीरपणे महिलांच्या वेशभूषा वर आणि महिलांबाबत बदनामीकारक वक्तव्य अनेक कीर्तनातून करत असत. त्यावेळेला हे सर्व कुठे होते असाच प्रश्न पडतो?

असो उशिरा का होईना परंतु धाडस करून लिहायला तरी सुरुवात केली "हे ही नसे थोडके".

मनापासून शुभेच्छा.

माझी तर या जानेवारीपासूनच मनात एक संकल्पना आहे.

ती अशी की, आमच्या भूमाता फाऊंडेशनच्या माध्यमातून यावर्षीपासून आपल्या महाराष्ट्रात" #नो_ब्रा_डे" साजरा केला पाहिजे.

कृतीतून जेवढा संदेश जाईल तेवढा बदल होण्यास सोपे जाते. विरोध होईलच परंतु पुढाकार घेऊन करणेही तितकेच गरजेचे आहे.

आम्ही जेव्हा हा दिवस साजरा करू तेव्हा स्वतःहून तुम्ही यात सहभागी व्हाल हीच अपेक्षा.

हे ही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT