आत्महत्या चे केले फेसबुक लाईव्ह करत प्रियकराने मरणास कवटाळले कारण प्रेयसीने, मला तुझी गरज नाही, तू मर जा असे सुनावले.
प्रेयसीने मला तुझी गरज नाही, तू मर जा …असे बोलताच एका 27 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे.
विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापुर्वी या तरुणाने फेसबुक लाईव्ह करून कल्याण पश्चिम परिसरातील राहत्या घरात जीवन यात्रा संपवली. प्रेम प्रकरणातून आपण आत्महत्या करत असल्याचे या तरुणाने फेसबुक लाईव्हमध्ये म्हटले आहे.
या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. अंकुश नामदेव पवार (27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
अंकुश हा मुळचा जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या पिंपळगाव-रेणुकाई गावात कुटुंबासह राहत होता. त्यातच घरची परिस्थिती हलाखीची असल्याने अंकुश चार वर्षांपूर्वी कामाच्या शोधात कल्याणात आला.
एका खासगी रुग्णालयात वार्डबॉय म्हणून तो नोकरी करत होता. याच सुमारास त्याची एका घटस्फोट झालेल्या तरुणीशी ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.
विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासूनअंकुशचे त्या तरुणीशी प्रेमसंबंध सुरू होते. त्यामुळे दोघांनी लग्न करण्याचेही ठरवले होते.
अंकुश हा लग्न करण्यासाठी आपल्या पगाराचे पैसे प्रेयसीकडे जमा करून ठेवत होता. मात्र हेच जमा केलेले पैसे प्रेयसी पार्टी आणि मौज-मज्जा करण्यासाठी उडवत असल्याची माहिती अंकुशला मिळाली. त्यामुळे त्याने प्रेयसीला याबाबत विचारणा केली.
त्यातून दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले. प्रेयसी अंकुशशी उद्धटपणे वागत होती. प्रेयसीचे वागणे त्याच्या जिव्हारी लागत होते. माझ्या जीवाचे बरे-वाईट करतो म्हणून त्याने प्रेयसीला धमकीही दिली. यावर प्रेयसीने देखील तू मरून जा, मला तुझी गरज नाही' असे अंकुशला सुनावले. त्यामुळे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.
गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अंकुशने काही मिनिटांत फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्याला प्रेमात धोका मिळाल्याने आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे. तर प्रेयसीने छळ केल्यामुळेच आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप मृत अंकुश याच्या नातेवाईकांकडून लावण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी सखोल चौकशी करत आहेत.