मुंबई

अनिल देशमुखांचा गोपनीय अहवाल लीक करण्यासाठी पीएसआयला iPhone 12 Pro दिला?

backup backup

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : अनिल देशमुखांचा गोपनीय अहवाल : महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख यांचा भ्रष्टाचार प्रकरणात गोपनीय अहवाल लीक करण्यासाठी सीबीआयच्या पीएसआयला १ लाख रुपये किंमतीचा iPhone 12 Pro लाच म्हणून देण्यात आल्याचे समोर आले आहे. सुत्रांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

तपासकर्त्यांनी सांगितले की, उपनिरीक्षक अभिषेक तिवारी आणि माजी मंत्र्यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्धच्या तपासावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केल्यामुळे अटक केली आहे. मुंबईचे माजी पोलीस प्रमुख परमबीर सिंग यांनी १०० कोटी वसुलीचा आरोप केल्यानंतर एप्रिल महिन्यात अनिल देशमुख यांनी पद सोडले.

अनिल देशमुखांचा गोपनीय अहवाल : वकिलांनी दिला iPhone 12 Pro

पहिल्या माहिती अहवालात (एफआयआर) सीबीआयने  म्हटले आहे की, अभिषेक तिवारी अनिल देशमुख यांच्याविरुद्धच्या खटल्याच्या तपासाच्या संदर्भात २८ जूनला पुण्याला गेले होते. वकील आनंद डागा यांनी अभिषेक तिवारी यांची भेट घेतली. त्यानंतर डागा यांनी चौकशी संदर्भात माहिती देण्यासाठी अभिषेक तिवारीला बेकायदेशीरित्या iPhone 12 Pro बदल्यात दिला.

iPhone 12 Pro अभिषेक तिवारीकडून जप्त

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, iPhone 12 Pro अभिषेक तिवारीकडून जप्त करण्यात आला आहे आणि फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आला आहे. तिवारी नियमितपणे माजी मंत्र्यांच्या वकिलाकडून लाच घेत असल्याचा सीबीआयचा आरोप आहे.

तिवारीने आनंद डागा यांच्यासह अनेक प्रसंगी, देशमुख यांच्याविरुद्धच्या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित कार्यवाही मेमोरँडम, सीलिंग-अनसेलींग मेमोरँडम, स्टेटमेंट आणि जप्ती मेमोरँडम अशा विविध कागदपत्रांच्या प्रती व्हॉट्सॲपमधून पाठवल्या होत्या, असा आरोप सीबीआयने केला आहे.

अनिल देशमुख यांच्याविरूद्ध तपासाचा एक भाग म्हणून संवेदनशील कागदपत्रे ताब्यात घेण्याची जबाबदारी अभिषेक तिवारीकडे सोपवण्यात आली होती, पण त्यांनी विश्वासघात केला आहे, असे सीबीआयने म्हटले आहे.

उपनिरीक्षक आणि वकील दोघांनाही गुरुवारी दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी सीबीआयने देशमुख यांच्या जावयाची सुद्धा चौकशी अहवाल लीक होण्यावरून चौकशी केली होती.

हे ही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT