Zeeshan Siddiqui NCP appointment File Photo
मुंबई

NCP Mumbai President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी; राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी उमेश पाटील

ष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी तर राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी सोलापूर जिल्हाअध्यक्ष उमेश पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Zeeshan Siddiqui NCP appointment

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी तर राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी सोलापूर जिल्हाअध्यक्ष उमेश पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री पवार व खासदार पार्थ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

दिवंगत अजित पवार यांचे विचार, आदर्श आणि जनसेवेचा वारसा पुढे नेत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी उमेश पाटील आणि झिशान सिद्दीकी यांनी निष्ठेने व समर्पणाने कार्य करावे, अशी अपेक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली आहे.

कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना दमदाटी केल्यास गुन्हा

कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना दमदाटी करणाऱ्या वित्तीय संस्थांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. कर्जवसुलीसाठी दमदाटी प्रकरणात तातडीने शेतकऱ्यांची तक्रार नोंदवून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश सर्व जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले.

मायक्रोफायनान्स कंपन्यांनी सक्तीने किंवा दमदाटी करून वसुली करू नये, यासाठी रिझर्व्ह बँकेला पत्र पाठविण्यात येणार आहे. अशा प्रकारे बळाचा वापर करणाऱ्या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT