Maharashtra Vidhan Parishad Result Live Updates: विधान परिषदेच्या ५ जागांचा आज फैसला; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?

राज्यभराचे लक्ष लागलेल्या विधान परिषदेच्या ५ जागांसाठी आज मतमोजणीचा रणसंग्राम रंगणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होत आहे.
Maharashtra Vidhan Parishad Result Live Updates
Maharashtra Vidhan Parishad Result Live UpdatesFile Photo

Maharashtra Vidhan Parishad Result Live Updates:

राज्यभराचे लक्ष लागलेल्या विधान परिषदेच्या ५ जागांसाठी आज मतमोजणीचा रणसंग्राम रंगणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होत असून, ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांच्या या रणधुमाळीत तब्बल १८२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य उघडणार आहे. नागपूर, अमरावती, पुणे आणि औरंगाबादमधील या काट्याच्या टक्करमध्ये महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी बाजी पलटवणार? क्षणाक्षणाचे अपडेट्स मिळवा LIVE...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

छत्रपती संभाजीनगर: शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील काय म्हणाले?

"ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली होती. सर्वांनी मला मदत केली. या निवडणुकीत आम्ही व्हिजन घेऊन उतरलो होतो. आम्ही विरोधकांवर टीका करण्यापेक्षा व्हिजन पदवीधरांसमोर मांडला आहे. त्यामुळे मी पहिल्या फेरीत निवडून येईल," असा विश्वास शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

अमरावतीतील भाजपच्या बंडखोर संगीता शिंदे मतमोजणी केंद्रावर दाखल

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतमोजणी सुरू होत आहे. त्यासाठी भाजपाच्या बंडखोर उमेदवार तथा राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे या अमरावतीच्या लोकशाही भवनमध्ये मतमोजणी प्रक्रियेसाठी दाखल झाल्या आहे. माझे भाऊ अनिल बोंडे यांचा मला आशीर्वाद आहे, अशी प्रतिक्रिया संगीता शिंदे यांनी दिली आहे.

मतांचा कोटा दुपारनंतर ठरेल

मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर दुपारपर्यंत टपाली व सर्व मतपेट्या उघडून गठे तयार करण्याची प्रक्रिया होईल. सायंकाळी ५ वाजेनंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होईल. तेव्हाच मतांचा कोटा निश्चित होईल.

निकालाला किमान दीड दिवस लागणार

मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी चिकलठाणा एमआयडीसीतील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे मतमोजणी प्रारंभ होत आहे. त्यासाठी ४४५५ अधिकारी - कर्मचारी तैनात आहेत. ४१ उमेदवारांचे भवितव्य ठरविणासाठी एकाच वेळी ७० टेबलवर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. १३ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. बॅलेट पेपरमुळे निकालाला किमान दीड दिवस लागण्याची शक्यता आहे.

४ राज्यांमधील २८ विधान परिषद निवडणुकांचा आज निकाल

उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील विधानपरिषद निवडणुकांसाठी मतमोजणी

उत्तर प्रदेशातील ११, बिहारमधील ८, महाराष्ट्रातील ५ आणि कर्नाटकातील ४ जागांसाठी होणार मतमोजणी

सर्व २८ जागांचे निकाल आज रात्री उशिरापर्यंत जाहीर होण्याची शक्यता.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात कशी होणार मतमोजणी?

70 टेबलांवर 13 फेऱ्यांमध्ये होणार प्राथमिक मतमोजणी

8 जिल्ह्यांतील 842 मतदान केंद्रांवरील मतपत्रिकांची मोजणी

41 उमेदवार रिंगणात; 1 लाख 91 हजार 689 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

पहिल्या पसंतीच्या मतांनंतर कोटा पूर्ण न झाल्यास पुढील पसंतीक्रमानुसार मतांचे हस्तांतरण.

एकूण नोंदणीकृत मतदार - 3,26,700

एकूण मतदान - 1,91,689

एकूण मतदानाची टक्केवारी - 58.67%

जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी

धाराशिव - 62.53%

परभणी - 61.81%

हिंगोली - 61.58%

जालना - 59.81%

नांदेड - 59.81%

बीड - 59.68%

लातूर - 56.45%

छत्रपती संभाजीनगर - 55.73%

नागपूरमध्ये अशी होणार मतमोजणी

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण 38 उमेदवार रिंगणात आहेत. नागपूर विभागीय क्रीडा संकुलात सकाळी आठ वाजता पासून ८४ टेबलवर होणार मतमोजणी

३८ उमेदवारांच्या भाग्याचा आज होणार फैसला

दुपारपर्यंत मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करुन मतमोजणी सुरु होईल

त्यानंतर उर्वरित मतांची मोजणी केली जाईल, रात्री आठ पर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होईल

एकदा वैध मते निश्चित झाल्यानंतर विजयी उमेदवारासाठीचा विजयाचा कोटा निश्चित केला जाईल...

त्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये जर एखादा उमेदवार त्या कोट्यापर्यंत पोहोचत असेल तर त्याला विजयी घोषित केले जाईल.

अन्यथा दुसऱ्या, तिसऱ्या आणि त्यानंतर पुढच्या पसंतीच्या मतांची मोजणी करून कोणता उमेदवार विजयाच्या कोट्यापर्यंत आधी पोहोचतो हे पाहिले जाईल...

जोपर्यंत एखादा उमेदवार विजयाच्या कोट्यापर्यंत पोहोचत नाही, तोवर पसंतीक्रमानुसार मतमोजणी सुरू राहील.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी 64.76% मतदान झाले आहे. म्हणजेच 2 लाख 55 हजार 603 मतदारांपैकी 1 लाख 65 हजार 541 मतदारांनी मतदान केले आहे.

जिल्हावार मतदान टक्केवारी

नागपूर 60.3 %

भंडारा 67.07%

गोंदिया 71.53%

वर्धा 68.37%

चंद्रपूर 72.59%

गडचिरोली 72.95%

logo
Pudhari News
pudhari.news