शेळगाव: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती शेळगाव(ता.इंदापूर)येथील सुपुत्र व सोलापूर जिल्हातील मोहोळ विधानसभा मतदारसंघांचे माजी आमदार यशवंत विठ्ठल माने यांनी पवार यांची 25 वर्षानी साथ सोडली असून त्यांनी आज मुंबई येथे शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते व माजी आमदार राजन पाटील यांच्या समवेत भाजप पक्षात जाहीर प्रवेश झाला आहे. (Latest Pune News)
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण,ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे प्रमुख उपस्थितीत भाजप मध्ये शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत प्रवेश केला आहे.
आगामी काळात दळ पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली व नेतृत्वखाली मोहोळ मतदारसंघात तसेच सोलापूर ,पुणे जिल्हातील भाजपा मधील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना सोबत घेवून पक्ष संघटना मजबुतीकरण करण्यासाठी काम करणार आहे असे भाजपा पक्षात दाखल झालेले माजी आमदार यशवंत माने यांनी दै.पुढारी बोलताना दिले.
यशवंत माने पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेळगाव गावचे सुपुत्र असून ते सन 1999 पासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये व उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे बरोबर पक्षात काम करत विविध पदावरती पक्ष संघटनेमध्ये व विविध राजकीय संस्थेवरती काम पाहिलेले आहे. माने यांचे इंदापूर तालुक्यामध्ये गावोगावी मोठा चाहता वर्ग मोठा असून त्यांचा मोठा जनसंपर्क इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात आहे.त्याचा फायदा इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीला आगामी काळातील निवडणुकी मध्ये होणार असून माने यांच्या भाजपा प्रवेशाने इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. इंदापूर तालुका भाजप पक्षाला मोठा आधार मिळाला आहे.
मोहोळ बरोबरच इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना सोबत घेवून कामकाज करणार असल्याचे देखील माने यांनी सांगितले आहे.