Crime News  pudhari
मुंबई

Mumbai Crime : वडाळ्यात सतरा वर्षीय मुलावर चाकूने हल्ला

जखमीवर सायन रुग्णालयात उपचार सुरु

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : क्षुल्लक वादातून एका सतरा वर्षांच्या मुलावर तीन अल्पवयीन मुलांनी चाकूने हल्ला केल्याची घटना वडाळ्यात घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या विघ्नेश गणेश देवेंद्र याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहे. वडाळा टी. टी. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांना डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

विघ्नेश हा वडाळ्यातील सायन-कोळीवाडा परिसरात राहत असून आरोपी मुले याच परिसरात राहतात. बुधवारी रात्री नऊ वाजता त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता.

या वादातून विघ्नेशला तिघांनी शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. याचदरम्यान एका मुलाने त्याच्या मानेवर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा वार त्याने चुकवल्याने त्याच्या कानाला, खांद्याला आणि दंडाला दुखापत झाली. या हल्ल्यानंतर तिन्ही मुले तेथून पळून गेली होती.

  • जखमी विघ्नेशला स्थानिक रहिवाशांनी सायन रुग्णालयात दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळताच वडाळा टी टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही मुलांविरुद्ध गुन्हा नोंदवून तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले असून तिघेही पंधरा ते सतरा वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT