V N Desai Hospital Closure pudhari photo
मुंबई

V N Desai Hospital : व्ही. एन. देसाई रुग्णालय 'तीन महिने' बंद राहणार!

ओपीडी सुरूच राहणार, कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय रुग्णालयातील विद्युत व्यवस्था आणि ड्रेनेजची मोठी कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे १२ नोव्हेंबरपासून हे रुग्णालय पुढील तीन महिने बंद राहणार आहे. या काळात रुग्णालयातील कर्मचारी वांद्रे येथील के. बी. भाभा आणि जोगेश्वरी येथील एचबीटी ट्रॉमा केअर रुग्णालयात पाठविण्यात येणार आहेत. रुग्णालयाच्या आवारात कंटेनर उभारून केवळ बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवला जाणार आहे.

पालिकेच्या केईएम, नायर, शीव व कूपर रुग्णालयांमध्ये दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत असताना व्ही. एन. देसाईमधील सर्व कर्मचाऱ्यांना केवळ भाभा आणि एचबीटी ट्रॉमा रुग्णालयात पाठविणे कितपत योग्य, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जनतेच्या आक्रोशापुढे प्रशासन झुकले

व्ही. एन. देसाई रुग्णालयात दुरुस्ती आणि विद्युत कामांमुळे येथील बाह्यरुग्ण विभाग तात्पुरता बंद करण्याचा घाट घातला गेला होता, परंतु ओपीडी बंद करण्याच्या निर्णयाविरोधात स्थानिक रहिवासी, शिवसेना आणि इतर राजकीय नेत्यांनी तीव्र विरोध व आंदोलन केले होते, त्यानंतर प्रशासनाने ओपीडी सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT