Vimal Elaichi Ad Actors Pudhari
मुंबई

Vimal Elaichi Ad Actors: विमल इलायची जाहिरात प्रकरणी तिन्ही अभिनेते दोषी

महाराष्ट्र FDA च्या चौकशीचा अहवाल संयुक्त आयुक्तांकडे; अजय देवगणने नोटिशीला उच्च न्यायालयात दिले आव्हान

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: विमल इलायचीच्या जाहिरात प्रकरणात बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) चौकशीत तिन्ही अभिनेत्यांना दोषी ठरविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

चौकशी अधिकाऱ्यांनी आपला अहवाल पुढील दंडात्मक कारवाईसाठी एफडीएच्या संयुक्त आयुक्तांकडे सादर केला आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील कलम ५३ अंतर्गत प्रत्येकी १० लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे.

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही अभिनेत्यांना बजावलेल्या नोटिसांना त्यांच्याकडून उत्तरे प्राप्त झाली आहेत. त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर चौकशी करण्यात आली.

या चौकशीत तिन्ही अभिनेते दोषी आढळल्याचा निष्कर्ष तपास अधिकाऱ्यांनी नोंदविला आहे. त्यानुसार अहवाल संयुक्त आयुक्तांकडे पाठविण्यात आला असून, आता पुढील दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू होणार आहे.

दरम्यान, अभिनेता अजय देवगण याने एफडीएच्या नोटिसीला उच्च न्यायालयात आव्हान दिल्याची माहितीही मुंढे यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणातील पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे. विमल इलायचीच्या जाहिरातीप्रकरणी एफडीएने ११ ऑगस्ट रोजी शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ या तिघांना नोटिसा बजावल्या होत्या.

या नोटिसांना तिघांनीही आपापली बाजू मांडणारी उत्तरे विभागाकडे सादर केली होती. आता चौकशी अहवाल संयुक्त आयुक्तांकडे गेल्याने दंडात्मक कारवाईच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT