Vile Parle Building Fire Pudhari
मुंबई

Vile Parle Building Fire: विलेपार्लेतील 13 मजली इमारतीत भीषण आग; एका महिलेचा मृत्यू, एक जखमी

फ्लॅटमध्ये अचानक लागलेल्या आगीमुळे धुराचे लोट; अग्निशमन दलाकडून बचावकार्य, कारणाचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : विलेपार्ले पूर्व येथील इमारतीत 13 व्या मजल्यावरील एका घरात लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. सोमवारी सकळी ही दुर्घटना घडली.

भावना सातरा (63) या महिलेचा मृत्यू झाला तर अनरी (34) महिला जखमी झाली आहे. त्यांना जवळील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विलेपार्ले पूर्व फिरोजशहा मेहता रोडवरील कुवकूवाडी येथे सुविधा पेरल ही तळ अधिक 13 मजली इमारत आहे. या इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये सोमवारी सकाळच्या सुमारास अचानक लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले आणि इमारतीत धुराचे लोट पसरले. इमारतीतील रहिवाशांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीबाहेर पळ काढला. मात्र या घटनेत काही जण इमारतीत अडकले होते.

मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य व आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र भावना सातरा व अनरी या दोन्ही महिला जखमी झाल्या. दोघींना नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता भावना यांना मृत घोषित करण्यात आले तर अनरी यांच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नसून मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी पालिकेच्या विभागीय कार्यालयाचे अधिकारी व स्थानिक पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT