Girl Molestation file photo
मुंबई

Vikhroli Molestation Case: रिक्षा चालकाकडून बालिकेचा विनयभंग; रिक्षातून फिरवण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले

विक्रोळीत ११ वर्षीय मुलीला रिक्षातून फिरवण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन विनयभंग केल्याचा आरोप; ४९ वर्षीय रिक्षाचालकाला अटक.

पुढारी वृत्तसेवा

कुर्ला: मैत्रिणीसोबत खेळत असलेल्या एका ११ वर्षीय मुलीला रिक्षातून फिरवून आणण्याच्या बहाण्याने निर्जन ठिकाणी नेत रिक्षा चालकाने तिचा विनयभंग केला. विक्रोळी परिसरात ही घटना घडली असून याबाबत विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी रिक्षा चालकाला अटक केली आहे. गोदरेज रुग्णालय परिसरातील गेट नंबर २ जवळ २१ सप्टेंबरला ही घटना घडली आहे.

पीडित मुलगी आणि आरोपी रिक्षा चालक हनुमंत काशाबा महापूरे (४९) हे एकाच परिसरात राहतात. घटनेच्या दिवशी आरोपीने अल्पवयीन मुलीला रिक्षातून फिरवून आणण्याच्या बहाण्याने गोदरेज रुग्णालय परिसरात नेले. सायंकाळी सातची वेळ असल्याने यावेळी याठिकाणी नागरीकांची वर्दळ कमी होती.

हीच संधी साधत आरोपीने मुलीचा विनयभंग केला. आरोपी मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असल्याने मुलीने तत्काळ आरडाओरडा केला. त्यामुळे आरोपीने घाबरून तिला पुन्हा परिसरात आणून सोडले.

मुलगी घरी रडत आल्याने तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानुसार तिच्या आईने तत्काळ विक्रोळी पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT