Thane Slum Rehabilitation: ठाण्यात झोपडीधारकांसाठी मोठी बातमी! ५४ योजनांमध्ये सदनिकांचा ताबा; २६ प्रकल्पांचे काम सुरू

२६ योजनांचे बांधकाम सुरू; ५४ योजनांतील ७,५४५ झोपडीधारकांसाठी ९३७ पीएपी सदनिकांची उपलब्धता
Thane Slum Rehabilitation
Thane Slum RehabilitationPudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्यात येत असून, प्राधिकरण क्षेत्रातील आज अखेर ५४ योजनांत झोपडीधारकांना सदनिकांचा ताबा देण्यात आला आहे.

या योजनांत एकूण ७,५४५ झोपडीधारक असून ९३७ पीएपी सदनिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६९६ पीएपी सदनिकांचे हस्तांतरण पूर्ण झाले आहे.

तसेच, २६ योजनांत झोपडपट्टी व विक्री इमारतींचे बांधकाम सुरू असून या योजनांमध्ये ९,९७७ झोपडीधारक आहेत. या योजनांमध्ये ३,३९८ पीएपी सदनिकांचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय २ योजना मंजुरीच्या प्रक्रियेत असून, त्यामध्ये १,०६० झोपडीधारकांचा समावेश आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणे व संबंधित प्रस्तावांच्या प्रक्रियेतही मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. सुमारे ५९ प्रस्ताव विविध टप्प्यांवर असून त्यात तब्बल २२,९१८ झोपडीधारकांचा समावेश आहे.

Thane Slum Rehabilitation
Mumbai Road Work: मुंबई पुन्हा वाहतूक कोंडीच्या उंबरठ्यावर! १ ऑक्टोबरपासून रस्ते खोदकामाला सुरुवात

यापैकी ४० प्रस्तावांमध्ये स्वीकृत प्रस्ताव, स्वीकृतीचा ना हरकत दाखला प्रलंबित असलेले प्रस्ताव, ठाणे महानगरपालिकेने पात्र केलेले प्रस्ताव तसेच झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित झालेले प्रस्ताव यांचा समावेश असून, या प्रस्तावांमध्ये ११,७१८ झोपडीधारक आहेत. याशिवाय १९ प्रस्तावांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची कार्यवाही सुरू असून, त्यामध्ये ११,२०० झोपडीधारकांचा समावेश आहे.

प्राधिकरणाकडून केवळ नवीन योजना सुरू करण्यावर भर न देता पात्रता निश्चिती, पुनर्वसन क्षेत्र घोषित करणे, योजना मंजुरी, बांधकाम आणि लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा या संपूर्ण प्रक्रियेला गती देण्यावर भर दिला जात आहे.

Thane Slum Rehabilitation
Mumbai Idol Makers: हजारो गणेशमूर्तीं कारखान्यात पडून! मूर्ती ठेवण्यासाठी मूर्तीकारांपुढे आर्थिक भुर्दंडाचे संकट

प्रलंबित योजनांनाही गती देण्याची प्रक्रिया

प्राधिकरण क्षेत्रातील ७ योजनामध्ये सध्या काही तांत्रिक अडचणी असून त्यामध्ये ३,२१५ झोपडीधारकांचा समावेश आहे. या योजनांसह विविध टप्प्यांवरील प्रकल्पांच्या अडचणी दूर करून पुनर्वसनाची प्रक्रिया पुढे नेण्याच्या दृष्टीने प्राधिकरणाकडून कार्यवाही सुरू आहे.

सुरक्षित व कायमस्वरूपी निवारा उपलब्ध करून देणे, रखडलेल्या योजनांना गती देणे व विविध प्रशासकीय टप्प्यांवरील प्रस्तावांचा वेळेत निपटारा करणे, या उद्देशाने प्राधिकरणाची कार्यवाही सुरू आहे. प्राधिकरण क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसनाची प्रक्रिया सातत्याने पुढे जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news