Mumbai Road Work: मुंबई पुन्हा वाहतूक कोंडीच्या उंबरठ्यावर! १ ऑक्टोबरपासून रस्ते खोदकामाला सुरुवात

आगामी आठ महिने मुंबईकरांसाठी त्रासदायक
Mumbai Road Work
Mumbai Road WorkPudhari
Published on: 
Updated on: 

राजेश सावंत

मुंबई: पावसाळा कालावधीत मुंबई शहर व उपनगरासह राज्यात चार महिने रस्ते खोदण्यास बंदी घालण्यात येते. ही बंदी १ ऑक्टोबरपासून उठवण्यात येणार आहे.

त्यामुळे पावसाळ्यात बंद पडलेली रस्त्याची कामे पुन्हा सुरू होणार आहेत. त्यामुळे मुंबई शहर व उपनगरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार असून याचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागणार आहे.

मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रेट रस्त्याची कामे सुरू आहेत. यात मोठ्या रस्त्यांसह ९ मीटरपेक्षा कमी रस्त्यांचाही समावेश आहे. संपूर्ण शहरांमध्ये ३९५ किमी लांबीच्या रस्त्याची कामे सुरू आहेत. यात पश्चिम उपनगरात २५३ पूर्व उपनगरात ७० तर शहरात ७२ किमी कामांचा समावेश आहे.

जूनपासून सुरु होणाऱ्या पावसाळ्यामुळे ही कामे मे महिन्यामध्ये थांबवण्यात आली होती. एवढेच नाही तर खोदलेले रस्तेही बुजवण्यात आले. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली होती.

Mumbai Road Work
Mumbai Idol Makers: हजारो गणेशमूर्तीं कारखान्यात पडून! मूर्ती ठेवण्यासाठी मूर्तीकारांपुढे आर्थिक भुर्दंडाचे संकट

सुरक्षिततेकडे लक्ष देण्याच्या सूचना

रस्त्यांची कामे सुरू असताना नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी नियोजन करावे. प्रत्येक कंत्राटदाराने नागरिकांच्या सुरक्षेतेला विशेष प्राधान्य द्यावे, असे निर्देश रस्ते विभागाकडून देण्यात आले आहेत.

काम सुरू असलेल्या ठिकाणी बॅरिकेट्स लावणे, नागरिकांना चालण्यासाठी रस्ता ठेवणे, दिशादर्शक लावणे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, व अन्य सुरक्षतेची जबाबदारी कंत्राटदाराला पार पडावी लागणार आहे. त्यामुळे याचा परिणामही रस्त्यावरील वाहतुकीवर होणार आहे. त्यामुळे येणारे आठ महिने मुंबईकरांसाठी त्रासदायक ठरणार आहेत. विविध कारणास्तव मुंबई शहर आणि उपनगरामध्ये खोदकामांमुळे धुळीचा त्रास वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Mumbai Road Work
BEST Bus Route Changes: मुंबईकरांनो, बेस्ट बसचे मार्ग बदलणार! ५ ऑक्टोबरपासून नवे बदल; काही मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या

या प्रमुख रस्त्यांची कामे सुरू

शहर- रामनाथ गोयंका रोड व गायन सम्राट उस्ताद अझमत रोड, आर.एस. सप्रे मार्ग, अब्बासी मार्ग, जामे जमशेद रोड

पश्चिम उपनगरे- बोरिवली (प) लिंक रोड, सुमेर नगर येथील मुख्य रस्ता, चारकोप, सेक्टर-९ मधील रस्ते, एलिया सरवत उर्दू हायस्कूल मालवणी नाला येथून मालाड सांडपाणी प्रक्रिया केंद्र ते अब्दुल हमीद रोडपर्यंत उर्वरित लगून रोड विस्तारीकरण

पूर्व उपनगरे- पी. सोमाणी मार्ग व विक्रोळी (पू) स्लिप रोड, नाहूर (प) येथील फोर्टिस रुग्णालयाजवळील मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयाकडे जाणारा रस्ता

खोदकामामुळे प्रवासाला विलंब

अर्धवट असलेल्या या रस्त्याची कामे आता १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. त्यामुळे पुन्हा रस्ते ठिकठिकाणी खोदले जाणार आहेत.

यासाठी अनेक ठिकाणी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असून काही ठिकाणी एकेरी मार्गाने वाहतूक सुरू राहणार आहे. त्यामुळे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन, प्रवासास विलंब होणार आहे.

रस्त्यांसह ठिकठिकाणी पदपथाची कामेही सुरू होणार आहेत. एवढेच नाही तर रस्त्याखालून पर्जन्य जलवाहिन्या मलनि: स्सारण वाहिन्या, वीज व अन्य केबल टाकण्याची कामेही सुरू होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news